घरदेश-विदेशठाकरेंच्या अडचणी आणखी वाढणार, मशाल चिन्हावरून समता पक्षाची SC मध्ये धाव

ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढणार, मशाल चिन्हावरून समता पक्षाची SC मध्ये धाव

Subscribe

Samata Party News | ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण, समता पक्षाने मशाल चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Samata Party News | नवी दिल्ली – पक्ष आणि सत्ता हातातून गेल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) सध्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असून ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सकारात्मक आदेश देते की त्यांच्याविरोधात निर्णय लागतोय हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण, समता पक्षाने मशाल चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. परंतु, पुण्यातील पोटनिवडणुकीत ठाकरे गट मशाल चिन्ह वापरू शकतं. तसंच, निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देईपर्यंत ठाकरे गट मशाल चिन्ह वापरू शकणार आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतही ठाकरे गटाने मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. समता पक्षाचेही पक्षचिन्ह मशाल आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेत हे चिन्ह गोठवण्याची मागणी समता पक्षाकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस नेते पवन खेरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

बिहारहून समता पक्षाचे प्रतिनिधिमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटीसाठी आले होते. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. हे चिन्ह गोठवण्यास मदत करण्याची मागणी यावेळी प्रतिनिधिमंडळाने केली. ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात समता पक्षाचे प्रतिनिधिमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीनंतरच समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

- Advertisement -

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि दिवंगत नेता जॉर्ज फर्नांडिस यांनी १९९४ साली समता पक्षाची स्थापना केली होती. मात्र, २००४ सालीच निवडणूक आयोगाने समता पक्षाची मान्यता रद्द केली आहे. दरम्यान, २०२२ मध्ये अंधेरी पोटनिवडणुकीकरता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले होते. या चिन्हावरून समता पक्षाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मशाल चिन्ह गोठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. आता पुन्हा एकदा समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

हेही वाचा – Delhi Liquor Scam : अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीकडून समन्स, कथित घोटाळ्याची होणार चौकशी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -