CBI विरूद्ध CBI : अहवाल उघड झाल्यानं न्यायालयाची नाराजी

CBI  विरूद्ध CBI : अहवाल उघड झाल्यानं न्यायालयाची नाराजी

सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद सध्या न्यायालयामध्ये पोहोचला आहे. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सीव्हीसीचा अहवाल उघड झाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. मोहोरबंद पाकिटातील अहवाल उघड झालाच कसा? असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित करत संबंधित प्रकरणातील सर्व वकिलांना झापलं आहे. सीबीआयमधील वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. सोमवारी भ्रष्टाचाराबाबत केंद्रीय दक्षता आयोगानं अहवाल सादर केला आहे. या अहवालावर अलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये उत्तर दिलं. मंगळवारी अर्थात आज या प्रकरणावर सरन्यायधीश रंजन गोगोई, एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं अहवाल फुटल्यानं संबंधित प्रकरणातील सर्व वकिलांना झापलं आहे.

सीबीआयमध्ये लाचखोरीवरून सुरू झालेल्या वादानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप करत संचालक आणि विशेष संचालकांना सक्तिच्या रजेवर पाठवलं. त्यानंतर १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या. परिणामी हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचला. पण, सीव्हीसीचा अहवाल उघड झाल्यानं आता सर्वोच्च न्यायालयानं त्यावर नाराजी व्यक्त करत वकिलांना झापलं आहे.

वाचा – ‘अस्थनांच्या चौकशीपासून डोवाल यांनी रोखलं’

 

First Published on: November 20, 2018 1:00 PM
Exit mobile version