घरदेश-विदेश'अस्थानांच्या चौकशीपासून डोवाल यांनी रोखलं'

‘अस्थानांच्या चौकशीपासून डोवाल यांनी रोखलं’

Subscribe

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राकेश अस्थाना यांच्या चौकशीसाठी आडकाठी केल्याचा आरोप सीबीआयचे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला.

सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद सर्वांनाच ठावूक आहे. या प्रकरणामध्ये आता दिवसेंदिवस नवीन नवीन खुलासे होत आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांची चौकशी करण्यापासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आडकाठी केल्याचा आरोप सीबीआयचे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. लाचखोरीच्या आरोपानंतर राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करणारे उपमहासंचालक मनीषकुमार सिन्हा यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका सादर केली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री हरिभाई चौधरी  यांच्यावर देखील लाचखोरीचा आरोप केला. दरम्यान, सीबीआयचे संचालक अलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यानंतर २० ऑक्टोबरच्या रात्री संचालकांसह १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सीबीआयमध्ये झालेल्या या बदलीमध्ये मनीषकुमार सिन्हा यांची बदली देखील नागपूरला करण्यात आली आहे.

याप्रकरणानंतर सीव्हीसी अर्थात केंद्रीय चौकशी आयोगानं अलोक वर्मा यांच्यासंदर्भातील चौकशी अहवाल सादर  १६ नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आला होता. सीव्हीसीचा अहवाल मिश्र आणि परिपूर्ण असल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांना सांगितलं आहे. दरम्यान, अलोक वर्मा यांनी उत्तर दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यावेळी मात्र यावेळी सीबीआय विशेष संचालक राकेश अस्थाना यांना चौकशी अहवाल देण्यास नकार दिला होता. याप्रकरणातील पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी अर्थात आज होणार आहे.

वाचा – CBI वाद : अलोक वर्मांना CVCकडून क्लिन चीट नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -