NEET Exam : सुप्रीम कोर्टाचा परीक्षा पुढे ढकलण्यास नकार; वेळापत्रकानुसार होणार परीक्षा

NEET Exam : सुप्रीम कोर्टाचा परीक्षा पुढे ढकलण्यास नकार; वेळापत्रकानुसार होणार परीक्षा

सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नीट परिक्षा पुढे ढकलण्यास तसेच ती रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला असून १३ सप्टेंबर रोजीच ही परीक्षा होणार आहे. या याचिकेवर आज, बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यावेळी म्हटले की, वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कोरोना या जागतिक महामारीच्या दरम्यान नीट परीक्षा घेण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक पावले उचलणार आहेत. यावेर क्षमस्व, आम्हाला ऐकायचे नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हणत याचिका फेटाळली.

नीट आणि जेईई परीक्षेच्या मार्गासह नीट आणि जेईईच्या परीक्षेस परवानगी देणाऱ्या १७ ऑगस्टच्या आपल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याच्या निर्णयासह सहा गैर-भाजपशासित राज्यांच्या मंत्र्यांच्या याचिकेसह सर्व याचिका कोर्टाने चार सप्टेंबर रोजी फेटाळून लावल्या. देशभरातील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता नीट परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षा आयोजित करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. संपूर्ण देशात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा घेण्यात येणार असून, यासाठी १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा –

कोरोनामुळे मुंबईतील पालकांचा मुदतवाढीनंतरही आरटीई प्रवेशाला अल्प प्रतिसाद

First Published on: September 9, 2020 4:26 PM
Exit mobile version