Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेवरुन भिडले दोन गट; गोळीबारात तालिबानचा प्रमुख जखमी

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेवरुन भिडले दोन गट; गोळीबारात तालिबानचा प्रमुख जखमी

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेवरुन भिडले दोन गट; गोळीबारात तालिबानचा प्रमुख जखमी

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा करून तीन आठवडे झाले आहेत. अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबान्यांच्या हातात गेला नव्हता. अफगाणिस्तानमधील पंजशीर (Panjshir) ताबा मिळवणे बाकी होती. पण आता पंजशीरवर तालिबान्यांनी ताबा मिळवला असून अफगाणिस्तानवर पूर्णपणे तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. याबाबत अधिकृत घोषणा तालिबानने आज, सोमवारी केली आहे. शुक्रवारी पंजशीर तालिबान्यांच्या ताब्यात गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंजशीर ताब्यात घेतल्याचा आनंद तालिबान्यांनी गोळीबार करून साजरा केला होता. शनिवार अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्ता स्थापन करणार होते. परंतु अजूनही अफगाणिस्तानमध्ये सरकार काही स्थापन झाले नाही आहे. कारण आता अफगाणिस्तानमधील सरकार स्थापनेवरून तालिबानी आणि हक्कानी नेटवर्क एकमेकांना भिडले असून यामध्ये तालिबानचा प्रमुख मुल्ला बरादर जखमी झाला आहे. यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार येण्यास आणखीन विलंब लागू शकतो.

सध्या अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापनेवरून तालिबानमध्येच अंतर्गत मतभेद तीव्र होत आहेत. सरकार स्थापनेच्या दिवशी शनिवारी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख फैझ हमीद काबूलमध्ये दाखल झाले होते. यांच्या अचानक येण्याने सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला. फैझ हमीद काबूलमध्ये येण्यामागचे नेमके कारण काय आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण तालिबानच्या नव्या नेतृत्वासोबत ते चर्चा करण्यासाठी आल्याचे समोर आले. पण प्रत्यक्षामध्ये फैझ हमीद काबूलमध्ये येण्यामागचे कारण दुसरेच आहे. आता तालिबानमध्येच दोन गट निर्माण झाले आहे, एक तालिबान आणि दुसरा हक्कानी नेटवर्क.

शुक्रवारी पंजशीर जिंकल्यामुळे काबूलमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू आले होते. या गोळीबारात लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू झाला होता. पण प्रत्यक्षात या गोळीबारामागे तालिबानमधील निर्माण झालेल्या दोन गट कारणीभूत आहेत. हा गोळीबार तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधला संघर्ष असल्याचे समोर आले आहे. या संघर्षात तालिबान सरकारचे नेतृत्व करणारा मुल्ला बरादर जखमी झाला आहे. यामुळे आता काबूलमध्ये सरकार स्थापनकरण्यास आणखीन विलंब लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – Taliban Takeover Afganistan : पंजशीर प्रांतात ताबा मिळवला, तालिबान्यांचा दावा


First Published on: September 6, 2021 11:59 AM
Exit mobile version