Target Killings in Kashmir: काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट करून हत्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर, शाहांच्या हाती धुरा

Target Killings in Kashmir: काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट करून हत्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर, शाहांच्या हाती धुरा

नवी दिल्लीः काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार हिंदूंना टार्गेट करण्यात येत असून, त्यांचा खून करण्यात येतोय. आता काश्मीरच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी स्वतःच्या हाती धुरा घेतली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 3 जूनला उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि इतर अधिकाऱ्यासंह जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केलं आहे. काश्मीर खोऱ्यात हिंदूंना दहशतवाद्यांकडून टार्गेट करून हत्या केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेली ही दुसरी बैठक आहे.

या बैठकीत उपराज्यपालांबरोबरच केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा सहभागी होणार आहेत. ही बैठक काश्मीरमध्ये हिंदूंना दहशतवाद्यांना करण्यात येत असलेल्या टार्गेटला लक्षात घेऊन करण्यात येत आहे. बैठकीत अमरनाथ यात्रेच्या तयारीची समीक्षाही होणार आहे. ही यात्रा या महिन्याच्या शेवटी सुरू होऊ शकते.

17 मे रोजी आयोजित मागच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादविरोधी अभियानावर जोर दिला होता. त्यांनी सुरक्षा दलांना सीमेपलिकडून होणारी घुसकोरी रोखणे आणि केंद्रशासित प्रदेशातून दहशतवादाचा पूर्ण सफाया करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षित जागी होणार नियुक्ती

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यात असा निर्णय घेण्यात आला की, काश्मीरमध्ये पंतप्रधान रोजगार पॅकेजअंतर्गत नियुक्त काश्मिरी हिंदू कर्मचारी आणि जम्मूतील हिंदू कर्मचाऱ्यांना सहा जूनपर्यंत सुरक्षित जागी नियुक्त केले जाणार आहे. तसेच त्याचं निराकरण करण्यासाठी उपराज्यपाल सचिवालय आणि महा प्रशासनिक विभागात एक विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहे. जर कोणत्याही वरिष्ठाने त्यांना प्रतारित केल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.

हिंदू कर्मचाऱ्यांना दुर्गम भागात तैनात करण्याऐवजी एकाच शहरात किंवा गावात तैनात केले जाणार आहे. यासोबतच त्यांना निवासी सुविधाही देण्यात येणार आहे. दहशतवाद्यांनी नुकतीच शिक्षिका रजनी बाला आणि कर्मचारी राहुल भट्ट यांची हत्या केली होती. काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या वाढत्या घटनांमुळे हिंदू कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रजनी काश्मीरमध्ये काम करणारे हिंदू कर्मचारी त्यांच्या बदलीची मागणी करत आहेत.

केजरीवाल यांनी सुरक्षेची मागणी केली

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्याच्या घटनांबद्दल दु:ख व्यक्त केले आणि त्यांना पुरेशी सुरक्षा देण्याची मागणी केली. केजरीवाल म्हणाले की, दहशतवादी संघटनांना जम्मू-काश्मीरमधील जातीय सलोखा बिघडला आहे, त्यामुळेच काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात आहे. काश्मिरी पंडितांची सातत्याने हत्या होत आहे. या घटनांमुळे 90 च्या दशकात घडलेल्या घटनांच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

फारुख अब्दुल्ला यांनी दिला इशारा

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी अमरनाथ यात्रेदरम्यान सरकारला अत्यंत सावध राहण्याचा इशारा दिला. यात्रेदरम्यान एखादी किरकोळ अनुचित घटना घडली तर त्याचे केवळ जम्मू-काश्मीरवरच नव्हे तर संपूर्ण देशासाठी घातक परिणाम होतील, असे ते म्हणाले. त्यामुळे प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचा दावा करण्यापेक्षा सरकारने सत्य समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.


हेही वाचाः पाकिस्तानचं लवकरच तीन भागांत विभाजन होणार, बलुचिस्तानला वेगळं करण्याचा विचार, इम्रान खान यांचं मोठं विधान

First Published on: June 2, 2022 9:49 AM
Exit mobile version