पाकिस्तानचं लवकरच तीन भागांत विभाजन होणार, बलुचिस्तानला वेगळं करण्याचा विचार, इम्रान खान यांचं मोठं विधान

एकदा का अर्थव्यवस्था नष्ट झाली की देश डिफॉल्ट होईल, असंही इम्रान खान यांनी अधोरेखित केलंय. त्यानंतर जग पाकिस्तानला आण्विक नि:शस्त्रीकरण करायला सांगेल, जसे की युक्रेनमध्ये 1990 च्या दशकात झालं होतं.

No Pakistan PM has completed 5-year term in 75 years, here's why

इस्लामाबादः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान नेहमीच चर्चेत असतात. आता एका मुलाखतीत इम्रान खान यांनी पाकिस्तानचं तीन भागात विभाजन होणार असल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जर सरकारनं योग्य निर्णय घेतले नाहीत, तर येत्या काही दिवसांत पाकिस्तानची हालत आणखी खराब होणार आहे. त्यांचा देश तीन भागात विभागला जाईल. पाकिस्तान हा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जर विद्यमान सरकारनं योग्य निर्णय घेतले नाहीत, तर त्यांचा देश आत्महत्येच्या दिशेनं जाणार आहे.

इथे वास्तविक समस्या ही पाकिस्तान सरकार आहे. योग्य निर्णय घेतले गेले नाहीत तर मी लिहून देतो, ते संपून जातील, सर्वात आधी आमचं लष्कर बरबाद होईल. हे सरकार आल्यापासून रुपया आणि स्टॉक मार्केटमध्ये घसरण आली आहे.

देश डिफॉल्ट होणार

एकदा का अर्थव्यवस्था नष्ट झाली की देश डिफॉल्ट होईल, असंही इम्रान खान यांनी अधोरेखित केलंय. त्यानंतर जग पाकिस्तानला आण्विक नि:शस्त्रीकरण करायला सांगेल, जसे की युक्रेनमध्ये 1990 च्या दशकात झालं होतं. परदेशात भारताचा थिंकटँक बलुचिस्तानला वेगळं करण्याचा विचार करीत आहे, ती त्यांची योजना आहे, त्यामुळेच मी दबाव टाकत आहे.

अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न

पाकिस्तानातील सरकार हे हरेक पद्धतीनं अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणतात, पीएमएलचे प्रमुख नवाज शरीफ, पीपीपीचे सहअध्यक्ष आसिफ अली जरदारी यांनी नेहमीच अमेरिका, भारत, इज्रायलला एकत्र आणण्यासाठी काम केले आहे. भारताला मी सत्तेत नको आहे, कारण त्यांना स्वतंत्र परराष्ट्र धोरण हवे आहे.

इम्रान खान यांच्या विधानाचा निषेध

पीएमएल-एनचे नेते तलाल चौधरी यांनी इम्रान खान यांच्या विधानाचा निषेध केला आहे. मानसिकरीत्या ते आजारी असल्याचं सांगत इम्रान खान यांच्या विरोधात कारवाईची वेळ आल्याचंही त्यांनी सांगितलंय. सर्वोच्च न्यायालय आझादी मार्चमध्ये आपल्या आदेशांचं उल्लंघन केल्यासंबंधी रिपोर्ट मागितली आहे. त्यामुळे संस्थान त्यांच्या विरोधात भूमिका घेईल ही मला आशा असल्याचंही इम्रान खान म्हणालेत.


हेही वाचाः विशाखापट्टणममधील शिपिंग कंपनीच्या गोदामाला भीषण आग; 7 जण गंभीर जखमी