पोस्टाच्या ‘या’ योजनेवर मिळवा टॅक्सच्या फायद्यासह उत्तम व्याजदर; जाणून घ्या सविस्तर

पोस्टाच्या ‘या’ योजनेवर मिळवा टॅक्सच्या फायद्यासह उत्तम व्याजदर; जाणून घ्या सविस्तर

भारतीय डाक

भारतीय डाक म्हणजेच पोस्ट ऑफिस नेहमीच ग्राहकांना आकर्षक योजना देत असते. लहानशा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी भारतीय पोस्ट ऑफिस ९ लहान बचत योजना देत आहे. या नऊ बचत योजनांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC). लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांपैकी ही एक सर्वोत्तम योजना आहे. या योजनेंतर्गत, गुंतवणूकदार सर्वात कमी रकमेची गुंतवणूक सुरू करू शकतात, तर या अंतर्गत गुंतवणूकदारांना तुमच्या ठेवींवर सरकारी सुरक्षेचा लाभ देखील मिळतो.

जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर

पोस्ट ऑफिसच्या या योजनेंतर्गत १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक आपले खाते उघडू शकतो. या व्यतिरिक्त, पालक आपल्या मुलांच्या वतीने देखील खाते उघडू शकतात. या योजनेत किमान हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तर या गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राअंतर्गत केलेल्या ठेवींवर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर लाभांसाठी देखील पात्र ठरतात. त्यामुळे या अंतर्गत कितीही खाती तुम्हाला उघडता येऊ शकतात.

या योजनेंतर्गत गुंतवणूकदाराला ठेवीवर ६.८ टक्के चक्रवाढ व्याज मिळते. जर गुंतवणूकदाराने या योजनेंतर्गत हजार रुपये जमा केले, तर ५ वर्षांनी योजनेंची मुदक पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराला १३८९.४९ रुपये मिळतील. या योजनेतील मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांपर्यंत आहे. खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र १००, ५०० रुपये, १००० रुपये, ५००० आणि १० हजार रुपयांच्या गुंतवणूक पर्यायामध्ये उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही किमान १०० रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूकीलाही मर्यादा नाही. पाच वर्षात २१ लाख रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीस भरमसाठ पैसेही द्यावे लागणार आहेत. जर तुम्ही सुरुवातीला १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला २०.८५ लाख रुपये मिळतील.


तहसीलदार ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ, विधिज्ञ असीम सरोदे ACB कडे तक्रार करणार

First Published on: September 14, 2021 12:01 PM
Exit mobile version