टी-२० विश्वचषकाच्या सलामीत भारताचा दणदणीत विजय

टी-२० विश्वचषकाच्या सलामीत भारताचा दणदणीत विजय

women cricketers won t-20 worldcup over Australia

आयसीसी महिला क्रिकेट संघाने टी २० विश्वचषकाच्या सलामीत भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले होते. आयसीसी महिला क्रिकेट संघाला  टी २० विश्वचषकाच्या सालामीत भारताविरूद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिकंत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला १२ चेंडूत २७ धावा हव्या होत्या मात्र भारताने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले. भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. पहिल्या नऊ षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५८ धावांवर दोन गडी बाद अशी होती. मात्र नंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ११५ धावांवर बाद झाला. भारताने हा सामना १७ धावांनी जिंकत मालिकेची विजयाने सुरुवात केली.

 

फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले.या दमदार विजयाबाबत बोलताना पूनम यादवची आई मुन्नी देवी म्हणाली, “भारताच्या विजयाने मी खूप आनंदी आहे. मला टीम इंडियाच्या आजच्या विजयाचा खूप अभिमान आहे. महिला संघाने सामन्यात सुरूवात थोडीशी खराब केली होती, पण अखेरीस त्यांनी सामना जिंकला याचं मला समाधान वाटते.”

First Published on: February 21, 2020 5:11 PM
Exit mobile version