गुजरात दंगलीनंतर तिस्ता सेटलवाडांनी अहमद पटेलांसोबत भाजप सकारविरोधात रचला कट; एसआयटीचा आरोप

गुजरात दंगलीनंतर तिस्ता सेटलवाडांनी अहमद पटेलांसोबत भाजप सकारविरोधात रचला कट; एसआयटीचा आरोप

गुजरात दंगलीनंतर काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल आणि सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी भाजप सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने (SIT) अहवालात केला आहे. यासह गुजरात सरकारने तिस्ता सेटलवाड यांच्या जामीन अर्ज फेटाळला आहे.

तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी राज्यातील भाजप सरकारविरोधात कट आखला होता. यातून गुजरातची प्रतिमा डागाळण्याचा कट तत्कालीन राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दिवंगत अहमद पटेल यांच्या इशाऱ्यावर रचण्यात आल्याचं एसआयटीने म्हटले आहे. एसआयटीच्या दाव्यावरून आता आरोप – प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे. दरम्यान गुजरात पोलिसांकडून तिस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस अधिकारी आर.बी. श्रीकुमार यांच्या जामीन अर्जाला विरोध करत दोन साक्षीदारांचा हवाला देत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

एसआयटीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, तिस्ता सेटलवाड आणि अहमद पटेल यांच्यात आर्थिक व्यवहार झाला, अहमदाबाद येथील शाहीबागमधील सर्किट हाऊसमध्ये झालेल्या एका बैठकीत अहमद पटेल यांनी सेटलवाड यांना 25 लाख रुपये दिले. त्या आधीच्या बैठकीत 5 लाख रुपये देण्यात आले होते. या बैठकीत काही राजकीय नेते उपस्थित होते. हा पैसा गुजरात मदत नावाने जमा करण्यात आला होता. यासोबत सेटलवाड यांनी गुजरात गोध्रा रेल्वेजळीत कांडानंतर एका आठवड्यात मदत शिबिराचा दौरा केला, तसेच राजकीय नेत्यांसोबत बैठकाही घेतल्या. या दंगलीच्या घटनेला चार महिने उलटल्यानंतर सेटलवाड यांनी अतिशय गुप्तपणे तत्कालीन आयपीएस अधिकारी संजीव भट्टसोबत अहमद पटेल यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.

एसआयटीने असही आरोप केला की, तिस्ता सेटलवाड यांचा केंद्र सरकारने 2007 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. यावेळी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी हे प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. तिस्ता सेटलवाड यांनी गुरातमधील दंगल पीडितांच्या नाव पैसा गोळा करत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यांनी हा पैसा आपल्या खासगी कामांसाठी वापरल्याचेही म्हटले जातेय. तिस्ता सेटलवाड यांनी यातील63 लाख रुपये ‘सिटीजन फॉर जस्टिस अॅण्ड पीस’ (CJP) संस्थेच्या आयडीबीआयमधील बँक खात्यात आणि 88 लाख रुपये युनियन बँक ऑफ इंडियाच्या सबरंग ट्रस्टच्या खात्यात जमा केले होते. याच पैशात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप एसआयटीने केला आहे.

अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीमुळे असे आरोप केले जात असून विरोधकांची प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुजरात दंगलीत नरेंद्र मोदींना अडकवण्याचा कट

याप्रकरणी भाजपनेही पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, तिस्ता सेटलवाडचे लोक राजकीय हेतूने काम करत होते. गुजरातचे सरकार बरखास्त करून गुजरातचे मुख्यमंत्री बनवले जावेत, या उद्देशाने हे लोक काम करत असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने रचलेल्या कारस्थानाचे सत्य समोर येत आहे. गुजरातचे मोदी सरकार पाडण्याच्या आणि गुजरात दंगलीत मोदींसह निरपराध लोकांना अडकवण्याच्या राजकीय हेतूने तिस्ता आणि त्यांचे सहकारी काम करत होते. असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. 


मी शिंदे गटात प्रवेश केला नाही; मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया


First Published on: July 16, 2022 3:41 PM
Exit mobile version