धक्कादायक! दोन महिलांना आश्रमात डांबून ठेवून केला अनेकदा बलात्कार!

धक्कादायक! दोन महिलांना आश्रमात डांबून ठेवून केला अनेकदा बलात्कार!

अत्याचार

सध्या लॉकडाऊन दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान पंजाबच्या अमृतसरमध्ये एका मंदिरातील पुजाऱ्याने त्याच्या साथीदारांसोबत दोन महिलांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून त्यांच्यावर अनेकदा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंजाबच्या अमृतसर पोलिसांनी पुजारीसह एका साथीदाराला अटक केली आहे.

अमृतसरच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपीचे नाव महंत गिरधारी नाथ आणि दुसऱ्या आरोपीचे वरींदर नाथ असे नाव आहे. महंत गिरधारी नाथ अमृतसरमधील लोपोके पोलिस स्टेशन अंतर्गत गुरु ज्ञान नाथ आश्रम वाल्मीकि तीर्थ येथे मुख्य पुजारी म्हणून कार्यरत होता. तर दुसरा आरोपी हा महंत गिरधारी नाथ यांचा सहकारी होता.

या घटने संदर्भात पीडित महिलांनी पंजाब राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य तरसेम सिंह यांना पत्राद्वारे कळविले होते की, त्यांना आश्रमात बेकायदेशीरपणे ठेवले गेले आहे आणि आरोपी महंत सतत बलात्कार करत आहेत. या माहितीच्या आधारे तातडीने कार्यवाही करीत लोपोके पोलिसांनी सोमवारी आश्रम परिसरात छापा टाकला आणि पीडित महिलांना आश्रमातून बाहेर काढले. मग पोलिसांनी घटनास्थळावरून महंत गिरधारी नाथ आणि साथीदार वरंदर नाथ यांना अटक केली. पण नछत्र सिंह आणि सूरज नाथ हे दोघे जण आश्रमातून पळून गेले. पोलिस सध्या त्यांच्या शोध घेत आहेत.

डीएसपी गुरू प्रताप सिंह म्हणाले की, तरसेम सिंह यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही परिसरावर छापा टाकला आणि दोन आरोपींना अटक केली. जे पळून गेले आहेत त्यांना लवकरच अटक केली जाईल.

पोलिस सध्या महंत गिरधारी नाथ आणि वरंदर नाथ यांची चौकशी करत आहेत. या आश्रमात पूर्वी काय घडले याचा शोध पोलिस घेत आहेत.


हेही वाचा – Video: सोना मोहपात्राने केली भाईजानवर टिका!; म्हणाली, ..तरीही तो आहे सर्वात मोठा स्टार


 

First Published on: May 19, 2020 4:14 PM
Exit mobile version