Video: सोना मोहपात्राने केली भाईजानवर टिका!; म्हणाली, ..तरीही तो आहे सर्वात मोठा स्टार

‘Grew up with stories of Salman Khan breaking bottle on girlfriend’s head’: Sona Mohapatra on violence against women on TikTok
Video: सोना मोहपात्राने केली भाईजानवर टिका!; म्हणाली, ..तरीही तो आहे सर्वात मोठा स्टार

सध्या टिकटॉकवर स्टार फैजल सिद्दीकी याचा एक व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या व्हिडिओतून अॅसिड हल्ला करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप होत आहे. या व्हिडिओमुळे बॉलिवूडची गायिका सोना मोहपात्रा देखील भडकली आहे. तिने फैजल सिद्दीकीला फटाकरले असेल तरी बॉलिवूडच्या भाईजान सलमान खानला तिने निशाणा साधला आहे. यासंदर्भात तिने ट्विटर अकाऊंटवरून टिट्व केले आहे.

सध्या  सोशल मीडियावर सोना मोहपात्राचे हे ट्विट फारच व्हायरल होत आहे. तसेच तिचे चाहते देखील खूप प्रतिक्रिया देत आहे. गायिका सोना मोहपात्राने फैजल सिद्दीकीच्या व्हिडिओवर आक्षेप नोंदवत असे लिहिले की, व्हिडिओ जोडण्यापूर्वी आणि नंतर काहीही नाही आहे. तू या व्यक्तीची बाजू घेत आहेस आणि त्याचे समर्थन करत आहेस. आपल्या संस्कृतीत महिलांचा अपमान ही गोष्ट सामान्य आहे. आपण सलमान खानच्या गोष्टी बघत मोठे झालो आहोत. ज्यामध्ये तो सर्व लोकांसमोर आपल्या गर्लफ्रेंडला डोक्यावर बॉटल फोडत असे. तरीही तो देशातील सर्वात मोठा स्टार आहे? हे सर्व थांबण्याची गरज आहे.

बॉलिवूडची गायिका सोना मोहपात्रा तिच्या ट्विटमुळे नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर निर्भीडपणे आपले मत मांडत असते. काही दिवसांपूर्वी तिने मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूड गायक अनु मलिक यांच्या निशाणा साधला होता.

सोना मोहमात्राने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये फैजल सिद्दीकी एका मुलीवर अॅसिड फेकताना दिसत आहे. त्यावेळी त्या मुलीच्या चेहऱ्याचा रंग बदलेला दिसत आहे. फैजलच्या या व्हिडिओ तीव्र विरोध केला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही महाराष्ट्र डीजीपीला याची दखल घेण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – CoronaVirus: प्रतिबंधित लसीशिवाय ‘हे’ नवं औषधं थांबवू शकतं कोरोनाचा फैलाव!