चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला, चीनने समुद्रात उतरवल्या दोन मोठ्या विमानवाहू युद्धनौका

चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला, चीनने समुद्रात उतरवल्या दोन मोठ्या विमानवाहू युद्धनौका

चीन आणि तैवानमध्ये तणावाचं वातावरण सुरू आहे. या तणावाची स्क्रिप्ट अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीने लिहिली गेली आहे. नॅन्सीच्या दौऱ्यामुळे चीन आणि तैवान समोरासमोर उभे ठाकले आहेत. अनेक वर्षानंतर चीनची लढाऊ विमाने पुन्हा तैवानच्या हवाई क्षेत्रात दिसली आहेत. याव्यतिरिक्त तैवानला समुद्रात घेरण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे. कारण चीनने दोन मोठ्या विमानवाहू युद्धनौका समुद्रात उतरवल्या आहेत. एक शेडोंग (CV-17) आणि दुसरे Liaoning-001 असे आहे.

शेंडोंग (CV-17) बद्दल बोलायचे तर, ही अशीच एक विमानवाहू जहाज आहे, जी इतर जहाजांसोबत धावते. या कॅरिअरमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकेही असतात. ही विमानवाहू युद्धनौका २०१७ मध्ये कार्यान्वित झाली. हे वाहक एकावेळी ३६ विमाने वाहून नेऊ शकते. त्याची लांबी ३०५ मीटर आहे.

लिओनिंग-001

चीनचे Liaoning-001 विमानही अतिशय अत्याधुनिक आहे. किमान ८ युद्धनौकांसह त्याचा स्ट्राइक ग्रुप बनवतो. ही विमानवाहू नौका १९८८ मध्ये कार्यान्वित झाली. त्याची लांबी ३०४ मीटर आहे. तसेच हे वाहक एकाचवेळी ४० विमानं वाहून नेऊ शकते.

पेलोसींच्या तैवान दौऱ्याचा चीनकडून निषेध करण्यात आला आहे. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेनं परिणामांना तयार राहावं, अशा इशारा चीननं दिला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडूम तैवानच्या सीमांवर युद्ध सराव सुरु केला. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये असताना चीनकडून युद्धसराव करण्यात आला.


हेही वाचा : 2,217 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी चुकवल्याने Vivo India ला नोटीस


 

First Published on: August 3, 2022 11:16 PM
Exit mobile version