Terrorist Attack: दहशतवाद्यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; कुठे, कोणी दिली ट्रेनिंग वाचा

Terrorist Attack: दहशतवाद्यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; कुठे, कोणी दिली ट्रेनिंग वाचा

दहशतवादी ओसामा आणि जिशान कमर

दिल्ली पोलिसांकडून पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) प्रशिक्षित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा जणांना अटक केली असून यापैकी दोन पाकिस्तान प्रशिक्षित दहशवादी असल्याचे समोर आले आहे. पण आता तपास दरम्यान असे समजले आहे की, या सर्व संशयित दहशतवाद्यांना गाझी नावाच्या एका प्रमुख आणि लेफ्टनंट रँकच्या अधिकाऱ्याने प्रशिक्षण दिले होते. तसेच या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये कुविख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ अनिस इब्राहिमची मदत घेतली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, या प्रशिक्षण देण्याच्या कामात गाझीचे दोन शिष्य होते, ज्यांचे नाव जब्बार आणि हमजा असे आहे. पण दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान संघटीत आयएसआय प्रशिक्षित दहशतवादी मॉड्यूलमधील सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामधील दोन आरोपी जिशान कमर आणि ओसामाने पोलिसांना सांगितले की, त्यांना बोटीने पाकिस्तानला नेण्यात आले होते आणि काही छोट्या समुद्र प्रवासानंतर पाकिस्तानमधील ग्वादर बंदराजवळ जिओनीला पोहोचले. अनेक वेळा त्यांना बोट बदलावी लागली. एका पाकिस्तानीने त्यांचे स्वागत केले होते. त्यानंतर तो पाकिस्तानमधील सिंध प्रांतातीत थट्टा भागात एका फार्महाऊसवर घेऊन गेला.

त्या फार्महाऊसवर तीन पाकिस्तानी नागरिक होते. यामध्ये दोघे जब्बार आणि हमजाने त्यांना प्रशिक्षण दिले होते. हे दोघे पाकिस्तानी सैन्यामधील होते, कारण त्या दोघांनी लष्कराची कपडे घातली होती. हमजा सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे घालायचा, परंतु छावणीतील प्रत्येक जण त्याला आदर देत होते. त्याने दहशतवादी जिशान कमर आणि ओसामा या दोघांना बॉम्ब आणि आयईडी बनवण्याचे आणि दररोजच्या वापरातील वस्तूने स्फोट कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले. तसेच त्याने लहान बंदुक आणि एके-४७ हाताळण्याचे आणि वापरण्याचे देखी प्रशिक्षण दिले.

या दहशतवाद्यांमध्ये महाराष्ट्रातील जान मोहम्मद शेख (४७), दिल्ली जामियानगरचा ओसामा (२२) ऊर्फ सामी, उत्तर प्रदेश मधील रायबरेलीचा मूलचंद ऊर्फ लाला (४४) आणि बहराइच, उत्तर प्रदेशचा मोहम्मद अबू बकर (२३) यांचा समावेश आहे. पोलिसांनी या सर्वांना १४ दिवसांचा रिमांडवर घेतले आहे. इतर दोन आरोपी जिशान कमर आणि मोहम्मद अमीर जावेद या दोघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.


हेही वाचा – दिल्लीतील दहशतवाद्याचे धारावी कनेक्शन, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीने महत्त्वाची बैठक


First Published on: September 15, 2021 1:47 PM
Exit mobile version