Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिल्लीतील दहशतवाद्याचे धारावी कनेक्शन, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीने महत्त्वाची बैठक

दिल्लीतील दहशतवाद्याचे धारावी कनेक्शन, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीने महत्त्वाची बैठक

Related Story

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी बुधवारी सहा दहशतवाद्यांना अटक केल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई आणि दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी घातपात घडवण्याचा  दहशतवाद्यांचा प्लॅन होता. अशातच या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर मुंबईची लोकल ट्रेन असल्याची माहिती उघड झाली आहे. दिल्लीतील ३ तर मुंबईतील ३ ठिकाणी हा सिरिअल ब्लास्ट घडवून आणला जाणार होता. अशातच दिल्लीत अटक केलेल्या दहशतवाद्यांचे धारावी कनेक्शन समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

नुकतचं या बैठकीला सुरुवात झाल्याचूी माहिती समोर आली आहे. एटीएसचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर दुसरेकडे रेल्वे अधिकारी, जीआरपी कमिशनरांनी देखील आज उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीबाबत स्वत: माहिती दिली. नुकतचं या बैठकीला सुरुवात झाली असून महाराष्ट्र डीजीपी संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, एटीएस प्रमुख, गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.

- Advertisement -

दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. ही घटना संवेदनशील आहे. त्यामुळे देशाच्या स्तरावरील ही घटना असल्याने पोलीस प्रशासनाची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतर अधिक भाष्य करता येईल. आत्ता यावर बोलण योग्य ठरणार नाही. असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. तसेच या बैठकीला पोलिसांच्या सर्व युनिटचे मुख्य अधिकारी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

दिल्लीतील 3 तर मुंबईतील दोन ठिकाणे टार्गेटवर

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर दिल्लीतील राजकीय कार्यालये तसच संसद भवन सारखी महत्वाची कार्यालये टार्गेटवर होती असा संशय तपास यंत्रणांना आहे. मुंबईतील दादर, बांद्रा, प्रभादेवी, याच सोबत दक्षिण मुंबईतील अनेक भागांची रेकी दहशतवाद्यांनी केली होती.

दहशतवाद्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र एटीएसला जाग

- Advertisement -

दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आज महाराष्ट्र एटीएसला जाग आली आहे. एटीएसने दहशतवादी जान मोहम्मद शेखच्या संपर्कातील असलेल्या लोकांना अटक केली आहे. एटीएनं जान शेखला हालचालींची माहिती घेत जान शेखला रेल्वे तिकीट बुक करुन देणाऱ्या ट्रॅव्हल एजंट असगरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जानसोबत आणखी एकाचं तिकीट बुक करुन दिले होते. जानसोबतची ‘ती’ व्यक्ती कोण आहे. याचा एटीएसकडून शोध सुरू आहे.

टेरर कॅम्पमध्ये घेतल होते ट्रेनिंग

अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानाताली टेरर कॅम्पमध्ये ट्रेनिंग (Terror Camp in Pakistan) देण्यात आली होती. याच टेरर कॅम्पमध्ये 26/11 हल्ल्यातील दोषी दहशतवादी अजमल कसाब (Kasab) यानेही ट्रेनिंग घेतली होती. यासोबतच इतरही माहिती चौकशीत समोर आली आहे. , दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.

मुंबई लोकलची केली होती रेकी?

दिल्लीत पकडलेल्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबईतील दोन ठिकाणे होती. यात दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील अनेक ठिकाणची दहशतवाद्यांनीरेकी केली होती तर मुंबईतील अनेक भागांची रेकी करणार होते. यासंदर्भात रेल्वे पोलिसांनी एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्य़ालयात आयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रेल्वेच्या सुरक्षेवरही चर्चा होणार आहे.

मास्टरमाईंडच्या कुटुंबीयांना मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईत राहिवासी होता. या जान मोहम्मदची चौकशी एटीएस पथक करत आहे. मुंबईतील रेकी करण्याआधीच जान याला अटक करण्यात आली आहे. शेखला अटक करण्यात आल्यानंतर धारावी पोलिसांनी रात्रीच त्याची पत्नी आणि दोन मुलींना ताब्यात घेतलं.

दाऊदशी होते खास संबंध

डी कंपनीचा खास आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा हस्तक जान असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच जान याच्यावर भारतात दहशतवाद्या कारवाया करण्याची कामे सोपवली होती. . गणेशोत्सव, नवरात्री या सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची तयारी होती.


 

- Advertisement -