एका ट्विटमुळे अब्जोंचा फायदा

एका ट्विटमुळे अब्जोंचा फायदा

इलॉन मस्त

‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनींचे संस्थापक इलॉन मस्क यांनी कंपनीच्या गुंतवणूक दारांना शेअर परत करण्याचे आवाहन केल आहे. टेस्ला कंपनी आपले शेअर प्रत्येकी ४२० डॉलर्सला विकत घेत असल्याचे ट्विट मस्क यांनी केल. या ट्विटनंतर गुंतवणूक दारांमध्ये एकच खळबळ माजली असून त्यांच्या शेअर्सचा भाव वधारला.कंपनीचे खाजगीकरण करत असल्यामुळे हे शेअर्स विकत घेतले जात असल्याचे मस्क यांच्या कडून सांगण्यात येत आहे.मस्क यांनी मंगळवारी ट्विट करुन याबद्दल माहिती दिली. कंपनीला व्हॉल स्ट्रीटच्या बाहेर आणून खाजगी करण्याचा मस्क यांनी निर्णय घेतला.

ट्विटचा परिणाम

इलॉन मस्क यांनी ट्विट केल्यानंतर त्यांच्या शेअर्सचा भाव वधारला आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत ११ टक्क्यांनी वाढत त्यांची किंमत ३७९.५७ डॉलर्स झाली आहे. त्यामुळे कंपनीला ९६ अब्ज रुपये मिळाले. ४७ वर्षीय मस्क हे या कंपनीचे मोठे शेअरहोल्डर आहेत आणि जगातील ३१ व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार बनवण्याचे काम करणारी एक मोठी कंपनी आहे. जर मस्क यांनी आपलाहा निर्णय कायम ठेवत कंपनीचे खाजगीकरण करतात तर हा सर्वात मोठा व्यवहार ठरणार आहे.

मस्क यांनी लिहिले कर्मचाऱ्यांना पत्र

कंपनीतील कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. कंपनीला खाजकी करण्याबाबत हे पत्र लिहिण्यात आले.”कंपनी आता खाजगीकरण करत आहे. शॉर्टटर्म फायद्याचा विचार न करता कंपनी लांबचा विचार करुन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनी खाजगी झाल्यास निर्णय घेण्यासाठी कंपनीला मदत होईल.”

लोकांची प्रतिक्रिया

मस्कच्या ट्विटला लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी कमेंट वरुन त्यांना प्रश्न विचारले. कंपनीचे सीईओ तेच रहातील का असे त्यांना विचारले. यावर त्यांनी कोणताही बदल होणार नसल्याचे उत्तर दिले आहे. खाजगीकरण केल्यावर कंपनी तोट्यात असताना फायदा कसा करुन देणार? यावर पर्याय काढणे हे मस्क समोर एक मोठ आव्हान आहे.

First Published on: August 8, 2018 9:35 PM
Exit mobile version