Thackeray group : …तर भाजपाचे दुकान एका रात्रीत बंद पडेल, ठाकरे गटाचा टोला

Thackeray group : …तर भाजपाचे दुकान एका रात्रीत बंद पडेल, ठाकरे गटाचा टोला

मुंबई : भाजपाने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे. भाजपाने स्वतःचा चेहरा आणि अस्तित्व गमावले आहे. भाजपeमध्ये इतके काँग्रेसवाले घुसले आहेत की, त्या सर्व काँग्रेसवाल्यांनी ठरवले तर भाजपाचे दुकान एका रात्रीत बंद पडेल, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

हेही वाचा – INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील धारावीत झाला. त्या निमित्ताने राहुल गांधी यांचे मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन झाले. त्या शक्तीप्रदर्शनाने भाजपा आणि त्यांच्या गुलाम गटांची बुबुळे बाहेर आली. रविवारी शिवतीर्थावर ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. सभेत देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहिले. देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून व खासकरून मुंबईतून झाली हे महत्त्वाचे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

खासदार राहुल गांधी म्हणजेच काँग्रेससोबत शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या ‘न्याय मंचा’वर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले म्हणून भाजपा आणि त्यांच्या गुलाम गटांत पोटाचे विकार सुरू झाले. ठाकरे यांना काँग्रेसबरोबर मंचावर जाणे वगैरे शोभते काय? अशी बकवास त्यांनी केली. ज्या भाजपाने स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट बांधले आहे, त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या मंचावर गेली याबद्दल दुःख व्यक्त करावे, हे आक्रित आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Thackeray vs BJP : ठाकरेंचे देशभक्त चालत नाही, पण…, व्हिडीओद्वारे ठाकरे गटाचा भाजपाला टोला

सर्व कलंकित चेहऱ्यांना सध्या भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊन ‘स्वच्छ’ वगैरे केले जात आहे आणि या सर्वांना भाजपाची दारे सताड उघडी केली जात आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाने अशा मंडळींपुढे शरणागतीच पत्करली आहे. स्वातंत्र्य काळात याच लोकांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करली होती आणि मानमरातब मिळवले होते. काही जण जेव्हा ब्रिटिशांचे ‘मुखबीर’ म्हणून, खबरे म्हणून काम करीत होते तेव्हा काँग्रेस स्वातंत्र्यलढ्यात संघर्ष करीत होती. आज देशावर आणि महाराष्ट्रात त्याच खबऱ्यांचे म्हणजे बेइमानांचे राज्य आहे, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.

हेही वाचा – Gandhi VS Modi : मोदींना माझे शब्द आवडत नाहीत; शक्तीवरून राहुल गांधींनी पुन्हा सुनावले

First Published on: March 19, 2024 8:32 AM
Exit mobile version