घरदेश-विदेशGandhi VS Modi : मोदींना माझे शब्द आवडत नाहीत; शक्तीवरून राहुल गांधींनी...

Gandhi VS Modi : मोदींना माझे शब्द आवडत नाहीत; शक्तीवरून राहुल गांधींनी पुन्हा सुनावले

Subscribe

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या शिवाजी पार्क येथील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आम्ही मोदींच्या विरोधात नाही, भाजपाच्या विरोधा नाही तर त्यांच्या मागे असलेल्या शक्तीच्या विरोधात लढत असल्याचे म्हटले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोविस तासांच्या आत पलटवार केला. इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा शक्ती संपविण्याची भाषा करत असून, ही लोकसभा निवडणूक शक्ती संपवण्याचा संकल्प करणाऱ्यांविरुद्ध शक्तीची उपासना करणाऱ्यांमध्ये होणार आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. यावर आता राहुल गांधी यांनी मला वेगळंच बोलायचं होतं असं म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Gandhi VS Modi Narendra Modi doesnt like my words Rahul Gandhi reiterated on Shakti)

हेही वाचा – Raj Thackeray : मनसे-भाजपा युतीच्या हालचालींना वेग; राज ठाकरे दिल्लीला रवाना

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्वीट करताना म्हटले की, मोदींना माझे शब्द आवडत नाहीत. त्यामुळे ते नेहमी कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना माहित आहे की, मी सत्य बोललो आहे. मी ज्या शक्तीचा उल्लेख केला आहे, ज्या शक्तीशी आपण लढत आहोत, त्या शक्तीचा मुखवटा मोदी आहेत. ही अशी शक्ती आहे की ज्याने आज भारताचा आवाज, भारताच्या संस्था, सीबीआय, आयटी, ईडी, निवडणूक आयोग, मीडिया, भारतीय उद्योग आणि भारताची संपूर्ण घटनात्मक रचना आपल्या तावडीत घेतली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

- Advertisement -

सत्तेसाठी नरेंद्र मोदी यांनी भारतीय बँकांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करतात, तर काही हजार रुपयांचे कर्ज फेडू न शकल्याने एक भारतीय शेतकरी आत्महत्या करतो. तीच शक्ती भारताच्या बंदरांना, भारतातील विमानतळांना दिली जाते, तर भारताच्या तरुणांना अग्निवीराची भेट दिली जाते, ज्यामुळे त्यांचे धैर्य भंग पावते. त्याच शक्तीला रात्रंदिवस सलाम करत असताना देशातील माध्यमे सत्य दडपून टाकतात. त्याच सत्तेचे गुलाम नरेंद्र मोदी जी देशातील गरिबांवर जीएसटी लादतात, महागाईवर नियंत्रण न ठेवता ती ताकद वाढवण्यासाठी देशाच्या संपत्तीचा लिलाव करतात. मी ती शक्ती ओळखतो, नरेंद्र मोदीही ती ताकद ओळखतात. ती कोणत्याही प्रकारची धार्मिक शक्ती नाही, ती अनीति, भ्रष्टता आणि असत्याची शक्ती आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी त्यांच्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा मोदी आणि त्यांचे खोटे बोलणारे यंत्र नाराज आणि संतप्त होतात.

हेही वाचा – Jitendra Kapoor : अभिनेते जितेंद्र यांच्याकडून मुंबईकरांना मतदानाचे आवाहन

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

दरम्यान, तेलंगणातील जगतयालमध्ये प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्यासाठी प्रत्येक आई, मुलगी ही शक्तीचे रुप आहे. मी भारतमातेचा पुजारी आहे. इंडिया आघाडीने शक्तीला संपवण्याचे आव्हान दिले आहे, त्यांचे आव्हान मी स्वीकारतो. मी माता, भगिनींना शक्तीस्वरुप मानतो. या माता, भगिनी आणि मुलींच्या रक्षणासाठी मी जीवाची बाजी लावायला तयार आहे. असे वक्तव्य करतानाच त्यांनी उपस्थित महिलांना उद्देशून म्हटले की, भारतीय धरतीवर कोणी शक्तीच्या विनाशाची भाषा करु शकतो का? शक्तीचा विनाश आम्हाला मान्य आहे का? तुम्ही सर्व शक्तीची अराधना करता की नाही? संपूर्ण देश शक्तीची पूजा करतो की नाही? असे प्रश्नही उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -