घरदेश-विदेशINDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या,...

INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

Subscribe

मुंबई : शिवतीर्थावर रविवारी ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी या वेळी जोरदार भाषणे केली. जनतेतही या सभेने ऊर्जेचा संचार झाला. त्याचा परिणाम असा झाला की, मोदी म्हणतात, या वेळी 370 जिंकू, पण अमित शहांनी आता सांगितले 300 जिंकू. म्हणजे मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या. जसजसे ‘इंडिया’चे वादळ घोंघावत जाईल तसे तसे भाजपाचे आकडे घसरत जातील, असा निशाणा ठाकरे गटाने भाजपावर साधला आहे.

हेही वाचा – Gandhi VS Modi : मोदींना माझे शब्द आवडत नाहीत; शक्तीवरून राहुल गांधींनी पुन्हा सुनावले

- Advertisement -

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील धारावीत झाला. त्या निमित्ताने राहुल गांधी यांचे मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन झाले. त्या शक्तीप्रदर्शनाने भाजपा आणि त्यांच्या गुलाम गटांची बुबुळे बाहेर आली. रविवारी शिवतीर्थावर ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. सभेत देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहिले. देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून व खासकरून मुंबईतून झाली हे महत्त्वाचे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – CJI on Electoral Bonds : सारे काही प्रसिद्धीसाठी, मला तोंड उघडायला लावू नका…; कोर्टातच भडकले सरन्यायाधीश

- Advertisement -

मुंबईतून 1942 साली ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखांच्या संख्येने जनसमुदाय जमला होता आणि स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वात मोठय़ा लढ्याची म्हणजे ‘चले जाव’ची घोषणा तेथे झाली. रविवारी शिवतीर्थावरून साधारण त्याच प्रकारची गर्जना झाली. ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर हुकूमशाही देशातील मोदी राजवटीत सुरू आहे आणि त्यांना ‘चले जाव’चा इशारा देणारी सभा मुंबईत पार पडली. याच सभेत ‘अबकी बार, भाजपा तडीपार’ अशी बुलंद हाक देण्यात आली, असेही या अग्रलेखात ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – Jitendra Kapoor : अभिनेते जितेंद्र यांच्याकडून मुंबईकरांना मतदानाचे आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -