‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

‘आम्हाला तुझा अभिमान…’, अर्जेंटिनाच्या महिलेने फडकावला भारताचा झेंडा

कतारमध्ये फिफा विश्वचषक सुरू असून, या विश्वचषकामध्ये अर्जेंटिनाच्या एका महिलेने भारतीय ध्वज स्वत: भोवती गुंडाळला होता. याबाबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने भारतीय ध्वज स्वत: भोवती गुंडाळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर एक भारतीय चाहता अर्जेंटिनाच्या ध्वजासोबत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहताच एका चाहत्याने ‘आम्हाला तुझा अभिमान आहे. आपण ग्रेट आहात”, असे लिहिले

इंस्टाग्रामवर ‘डिव्हाइड बाय नेशन युनिटेड बाय फूटबॉल’ अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कतारमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा थरार सुरू असून, सध्या गट फेरीचे सामने खेळवले जात आहेत. या फिफा विश्वचषकाकडे सध्या जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे, सध्या भारतातदेखील अनेक राज्यांतील फुटबॉल चाहते प्रत्येक सामना अतिशय आवडीने पाहत आहेत.(the argentinian woman waved the tricolor during the fifa world cup viral video)

दरम्यान, अर्जेंटिना आणि ब्राझील या संघांच्या सामन्यांमध्ये भारतीयांना अधिक ऋची आहे. सोबतच, फिफा वर्ल्डचा आनंद घेण्यासाठी अनेक भारतीय फुटबॉल प्रेमी कतारमध्येदेखील पोहोचले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये लेटी एस्टेव्हज नावाची अर्जेंटिनियन महिला यादिल एम इक्बाल नावाच्या भारतीय व्यक्तीसोबत दिसत आहे. यामध्ये इक्बाल मल्याळममध्ये बोलताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवरील हा व्हायरल व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओला अनेक लाइक्स देखील मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेक जण प्रतिक्रियाही देत आहेत. यावेळी एका युजरने लिहिले की, हा अद्भुत क्षण तयार केल्याबद्दल धन्यवाद. तसेच, एका यूजरने लिहिले की, ‘आम्हाला तुझा अभिमान आहे. आपण ग्रेट आहात”.


हेही वाचा – 6,6,6,6,6,6,6.., ऋतुराज गायकवाडने एकाच षटकात ठोकले 7 षटकार; रचला इतिहास

First Published on: November 29, 2022 4:04 PM
Exit mobile version