कोरोनाचा खुलासा करणाऱ्या सहाव्या डॉक्टरचा मृत्यू, त्वचा पडली होती काळी

कोरोनाचा खुलासा करणाऱ्या सहाव्या डॉक्टरचा मृत्यू, त्वचा पडली होती काळी

डॉ. हू वेफेंग यांचा कोरोनामुळे मृत्यू

चीनमध्ये कोरोना विषाणूचा खुलासा करणाऱ्या डॉक्टरांच्या टीममधील सहाव्या डॉक्टरचाही मृत्यू झाला आहे. डॉ. हू वेफेंग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. डॉ. हू वेफेंग चीनमधील वुहान सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मूत्र-तज्ज्ञ म्हणून काम करत होते आणि कोरोनाबद्दल चेतावणी देणारे पहिले व्हिसलब्लोअर डॉक्टर ली वेनलिंग यांच्या टीमचा भाग होते. चीनी माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार हू वेफेंग यांना गेल्या चार महिन्यांपासून संसर्ग होता.

डॉक्टर हू वेफेंग यांच्या निधनानंतर तिथल्या प्रशासनावर लोक टीका करत आहेत. जानेवारीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. कोरोनाविषयी इशारा दिल्यावर प्रशासनाने ली वेनलिंग यांना तोंड बंद ठेवण्यास सांगितलं. नंतर ली वेनलिंग यांनी रुग्णालयातून एका व्हिडिओद्वारे त्यांनी याबाबतचा खुलासा केला.


हेही वाचा – NisargCyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या उपाययोजना


हू वेफेंग यांची त्वचा पडली होती काळी

उपचारादरम्यान यकृतावर परिणाम झाल्याने त्यांच्या त्वचेचा रंग काळा झाला. चीनमध्ये, ते आणि त्यांचे सहकारी हृदयविकार विशेषज्ञ डॉ. यी फॅन यांची देखील त्वचा काळी पडली होती. हू वेफेंग यांच्या मृत्यूबद्दल अधिकची माहिती दगेण्यात आलेली नाही. परंतु सोशल मीडियावर लोक कोरोना साथीच्या आजाराला सामोरे जाण्याच्या चीनी सरकारच्या प्रयत्नांवर टीका करीत आहेत.

 

First Published on: June 3, 2020 12:39 PM
Exit mobile version