घरमहाराष्ट्रNisargCyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या उपाययोजना

NisargCyclone: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या उपाययोजना

Subscribe

निसर्ग चक्रिवादळाचा सामना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रिवादळ धडकणार आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळ वेगाने पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. किनाऱ्याकडे येताना या चक्रीवादळाचा वेग वाढत चालला आहे. चक्रिवादळचा फटका मुंबईला देखील बसणार आहे. मुंबईत प्रतितास १०० ते १२० किलोमीटर वेगाने सोसाटयाचे वारे वाहणार आहेत. निसर्ग चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना केल्या आहेत.

• मुंबईतील ए विभाग, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण, आर/मध्य अशा पश्चिम किनारपट्टीवरील विभाग अधिकाऱ्यांमार्फत धोकादायक आणि समुद्र किनाऱ्यानजीकच्या वस्त्यांतील नागरिकांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
• महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात आल्या असून नागरिकांना तेथे स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
• आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी मुंबई अग्निशमन दलास सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ६ चौपाट्यांवर आतापर्यंत ९३ लाइफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सर्व अग्निशमन केंद्रांना आवश्यक त्या यंत्रसामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आलं आहे.
• चौपाट्यांवर लाइफगार्डप्रमाणेच रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात करण्यात आल्या आहेत.
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईसाठी विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये एनडीआरएफची प्रत्येकी १ टीम कुलाबा (ए विभाग), वरळी (जी/दक्षिण), वांद्रे (एच/पूर्व), अंधेरी (के/पश्चिम) येथे ३ टीम, मालाड (पी/दक्षिण) आणि बोरिवली (आर/उत्तर) याप्रमाणे तैनात आहेत.
• आपत्कालिन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक १९१६ डायल करुन त्यानंतर ४ दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात.
• महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्ष फक्त चक्रीवादळसंदर्भातील व्यवस्थापन करण्याकरीता स्थापन करण्यात आला असून सर्व यंत्रणा म्हणजेच पोलीस, अग्निशमन दल, बेस्ट, उद्याने विभाग, जनसंपर्क विभाग यांचे प्रतिनिधी समन्वयासाठी हजर आहेत. याव्यतिरिक्त नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून घडामोडींवर नजर ठेवण्यात येत आहे.
• पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, सहाही पंपिंग स्टेशनवर पुरेसे मनुष्यबळ उपस्थित आहे.
• धोकादायक इमारतींची पाहणी करुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
• झाडांच्या फांद्या छाटण्याची कामे करण्यात आली आहेत. वादळामुळे उन्मळून पडणाऱ्या झाडांना तातडीने हलविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विभागामध्ये ४ याप्रमाणे ९६ पथके तैनात आहेत.
• पावसाळ्या पूर्वी नालेसफाई कामांचा भाग म्हणून काढण्यात आलेला गाळ इतरत्र हलविण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.
• वादळवाऱ्यांमुळे अडकून पडणाऱ्या वाहनांना टोईंग करण्याची व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
• अतिसंवेदनशील ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये वीजेसाठी जनित्र (जनरेटर) उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
• सध्याच्या कोविड-१९ विषाणू संसर्गाची परिस्थिती पाहता, कोरोना बाधितांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सेवा योग्यरित्या मिळतील, याचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Cyclone Nisarga: रेल्वे-विमान सेवांवर परिणाम; मुंबईत येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -