Water Purification: आता ड्रोनला कळणार पाण्याचा दुर्गंध; पर्यावरण संरक्षणास होणार मदत

Water Purification: आता ड्रोनला कळणार पाण्याचा दुर्गंध; पर्यावरण संरक्षणास होणार मदत

शहरांमधील कचरा वॉटर ट्रीटमेंट प्लांट (डब्ल्यूडब्ल्यूटीपी) पासून निर्माण होणारा दुर्गंध तेथील नागरिकांसह तेथील पर्यावरणासाठीदेखील समस्या निर्माण करते. या दुर्गंधीमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना श्वासोच्छ्वास घेणे देखील कठीण होते. या समस्येसाठी गंध व्यवस्थापनाकडून (odor management) विविध उपाययोजना केल्या जातात. आता ही समस्या सोडवण्याचा एक मार्ग वैज्ञानिकांना सापडला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, सेन्सॉरड ड्रोनची यात महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक भूमिका असू शकते. ‘रिमोट सेन्सिंग’ या जर्नलमध्ये या प्रयोगाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला आहे. बायोइन्जिनियरिंग ऑफ कॅटालोनिया (आयबीईसी) आणि डीएमए नावाच्या कंपनीने दुर्गंधी ओळखण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.  यासह स्निफड्रोन (Solution Monitoring with Purpose in Environment) या प्रकल्पाला खूप सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. या नवीन यंत्रणेच्या मदतीने, योग्य पाऊले उचलून व्यवस्थापनात सुधारणा करता येईल, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

दुर्गंध पाण्याचे स्त्रोत शोधण्यास मदत

डीएएमच्या संशोधन विभागाच्या तंत्रज्ञांनी यासाठी एक विशेष ड्रोन बनविला, ज्यामध्ये गंधाची तीव्रता शोधण्यासाठी आणि रीडिंगसाठी केमिकल सेन्सर बसवले आहे. त्याच्या मदतीने, दुर्गंध असणारे पाण्याचे स्त्रोत देखील शोधले जाऊ शकतात. सद्यस्थितीत, दुर्गंधाचा अभ्यास करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पद्धतीस इन्फ्रेव्हिएंट ओल्फॅक्टोमेट्रिक मापन म्हटले जाते मात्र त्याद्वारे अचूक आकलन होत नाही. त्यामुळे कोणतीही कामं योग्यरितीने केले जात नाही.

ड्रोनला २१ इलेक्ट्रॉनिक केमिकल सेन्सर

दरम्यान, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांनी विकसित केलेली प्रणाली दुर्गंध घनतेसाठी संपूर्ण ब्लू प्रिंट उपलब्ध करते, जे योग्य नियंत्रण उपाययोजना करून सर्व व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवते. या विशिष्ट ड्रोनमध्ये इलेक्ट्रॉनिक नोजसारखे कार्य करणारे २१ इलेक्ट्रॉनिक केमिकल सेन्सर बसविले आहेत. सध्या सेन्सर्सची संख्या जास्तीत जास्त ठेवण्यात आली आहे. याशिवाय त्याच्या सूक्ष्म सेन्सरमध्ये तापमान, आर्द्रता आणि दबाव सेन्सर देखील बसवण्यात आले आहेत. तसेच सॅम्पलिंग सिस्टम ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) ने सुसज्ज आहे. यामुळे, रिअल टाइममध्ये बेस स्टेशनसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने डेटावर प्रक्रिया आणि विश्लेषण करणे देखील सक्षम असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

First Published on: June 11, 2021 8:01 PM
Exit mobile version