सहा लाख लंपास केल्या प्रकरणी हवालदाराला अटक

सहा लाख लंपास केल्या प्रकरणी हवालदाराला अटक

प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय अन्वेषन शाखा (सीबीआय) ने टाकल्याले धाडीबद्दल आपल्याला नेहेमीच बातम्या मिळत असतात. सीबीआयची  धाड ही नेहेमी मोठ्या व्यक्तींच्या घरावर पडते. या धाडीत अनेकदा लाखो किंवा कोट्यावधी संपत्ती सापडते. या संपत्तीला सरकारी खात्यात जमा करण्याची जवाबदारी सीबीआयवर आहे. पैसे बघून अनेकांचे मन परिवर्तीत होतांना आपण चित्रपटात बघितले आहे. मात्र दिल्ली येथे अशी एक खरी घटना बघायला मिळाली आहे. सीबीआयने टाकलेल्या धाडीत एका हवालदाराने सहा लाख रुपये लंपास केली. या प्रकरणी हवालदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या हवालदाराकडून ही रोख ताब्यात घेण्यात आली आहे. सुदेश यादव असे या हवालदाराचे नाव आहे.

कसा घडला प्रकार

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच एका घरावर धाड टाकली होती. धाडी दरम्यान या घरात काही अवैध रक्कम आढळली. या धाडीत यादव यानेही चौकशी केली. त्याला आढळून आलेली रोकड त्याने लपवून ठेवली. ही रोकड सहा लखाची होती. टाकलेल्या धाडीत एक मोठी रक्कम गायब असल्याचे घर मालकाने सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा सर्वांची चौकशी केल्यानंतर रक्कम लपांस केल्याची कबूली यादव याने दिली. यादवने ही रक्कम याच घराजवळ लवपली होती.

First Published on: February 6, 2019 2:40 PM
Exit mobile version