अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट; आपच्या नेत्यांचे मोबाईल चोरीला

अरविंद केजरीवालांच्या रॅलीत चोरांचा सुळसुळाट; आपच्या नेत्यांचे मोबाईल चोरीला

दिल्ली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराल सुरूवात केली आहे. उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी कार्यकर्त्यांकडून विविध भागात सतत रॅली काढली जात आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रॅल काढली होती. मात्र त्यांच्या रॅलीमध्ये चोरांनी हात साफ केल्याची माहिती समोर येत आहे. आपच्या या रॅलीमध्ये तब्बल 20 नेत्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. (thieves stolen twenty aap leaders mobile phone in Arvind Kejriwal roadshow at malka ganj)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अरविंद केजरीवाल यांची दिल्लीतील मलका गंज परिसरात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सामील असलेल्या ‘आप’च्या अनेक नेत्यांपैकी 20 नेत्यांचे मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. मोबाईल चोरीची माहिती पोलिसांना दिली असून, पोलिस सध्या चोरांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलका गंज भागातील आपच्या रॅलीत चोरट्यांनी काही आप नेत्यांचे मोबाईल चोरले. आपचे आमदार अखिलेश त्रिपाठी, आप नेत्या गुड्डी देवी, आमदार सोमनाथ भारती यांचे सचिव यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. दिल्लीतील 250 वॉर्डांमध्ये 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.


हेही वाचा – आम्हाला गोळ्या घाला पण शिवरायांना आड आणू नका, मंगळसूत्र चोराचा उल्लेख करत मिटकरींचा निशाणा

First Published on: December 1, 2022 2:57 PM
Exit mobile version