ऑगस्टच्या अखेरीस येणार कोरोनाची तिसरी लाट; ICMR चा इशारा

ऑगस्टच्या अखेरीस येणार कोरोनाची तिसरी लाट; ICMR चा इशारा

India Corona Update: देशात आज कोरोनाबळींचा आकडा हजारावरचं; रुग्णसंख्या 1 लाख 72 हजारांवर

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर नियंत्रणात येत असून तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. देशात कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तिसरी लाट देशात येणार असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी तुलना करता या लाटेचा कहर काहीसा कमी असल्याचा अंदाज इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) विभागातील महामारी विज्ञान आणि विभाग प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी वर्तवला आहे.

कोरोनाची येणारी संभाव्य तिसरी लाट ही देशव्यापी असणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, ही तिसरी लाट कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे गंभीर आणि वेगाने संसर्ग पसरवणारी असेल, असेही डॉ. पांडा यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चार घटकांविषयीही माहिती त्यांनी दिली. या चार घटकांपैकी पहिला घटक म्हणजे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत मिळविलेली प्रतिकारशक्तीचे प्रमाण कमी होणे. जर प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे.

दुसर्‍या घटकात आतापर्यंत मिळविलेल्या प्रतिकारशक्तीवर नवा व्हेरिएंट तयार होऊ शकतो. डॉ. पांडा यांच्या मते, नवा व्हेरिएंट प्रतिकारशक्ती पार करू शकला नाही तर त्याचे स्वरूप गंभीर आणि झपाट्याने पसरले जाऊ शकते, असा तिसरा घटक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यासह चौथ्या घटकासंदर्भात बोलताना डॉ. पांडा यांनी असे म्हटले की, कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, राज्यांनी घाईने निर्बंध आणल्याने नवीन व्हेरिएंटमध्ये वेगाने वाढ होऊ शकते. हा व्हेरिएंट डेल्टा प्लस असू शकते का? याविषयी त्यांनी असे सांगितले की, डेल्टा आणि डेल्टा प्लस ही दोन्ही व्हेरिएंट देशभर पसरले आहे आणि डेल्टाच्या या व्हेरिएंटचा फटका किंवा त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होईल, अशी त्यांना अपेक्षा नाही.


गँगस्टर इकबाल मिर्चीच्या कुटुंबाची वरळीतील संपत्ती ईडीकडून ताब्यात

First Published on: July 16, 2021 8:36 AM
Exit mobile version