‘या’ फळाला म्हणतात फळांची महाराणी! नाव आहे ‘नूरजहाँ’; किंमत ऐकून व्हाल थक्क!

‘या’ फळाला म्हणतात फळांची महाराणी! नाव आहे ‘नूरजहाँ’; किंमत ऐकून व्हाल थक्क!

'या' फळाला म्हणतात फळांची महाराणी! नाव आहे 'नूरजहाँ'; किंमत ऐकून व्हाल थक्क!

सर्व फळांमध्ये आंब्याला फळांचा राजा असे म्हटले जाते, पण फळांची राणी कोण असेल? असा प्रश्न तुमच्या मनात बातमी वाचल्यावर नक्कीच उपस्थित झाला आहे. मध्य प्रदेशातील काठीवाडा भागात उगवलेल्या खास आंब्याला, फळांची राणी म्हणू शकतात, कारण त्याचे नाव ‘नूरजहाँ’ असे असल्याचे सांगितले जात आहे. या जातीच्या एका आंब्याची किंमत हजार रुपयांपर्यंत आहे.त्यामुळे या नूरजहाँ राणीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा आंबा गुजरातला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागातच पिकवला जातो. काठीवाडा हे इंदूरपासून साधारण अडीचसे किमी. अंतरावर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘नूरजहाँ’ या जातीच्या आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. यावर्षी या पिकाचे उत्पन्न चांगले झाले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, काठीवाड्यातील आंबा उत्पादक शिवराजसिंग जाधव यांनी असे सांगितले की, “माझ्या बागेत तीन नूरजहाँ आंब्याची झाडे आहेत, ज्यामध्ये साधारण २५० आंबे तयार झाले आहेत. बाजारात एका आंब्याची किंमत ५०० ते १००० रुपये मिळत आहे. हा आंबा महाग असला तरी यासाठी ग्राहकांकडून बुकिंग आधीच केले जाते.

मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही आंबाप्रेमींनी या महागड्या आंब्यांचे बुकिंग केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, नूरजहाँ आंब्याचे वजन २ ते साडेतीन किलो पर्यंत असते. काठीवाडा परिसरातील नूरजहाँ आंब्याच्या उत्पादनात काम करणारे तज्ज्ञांच्या मते, यावेळी नूरजहाँ आंब्याचे पीक चांगले आले आहे, पण कोविडच्या साथीने आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला आहे. गेल्या वर्षात खराब हवामानामुळे नूरजहाँ आंब्याचे उत्पादन चांगले झाल्याने मोठा फटका व्यवसायात बसला होता. यापूर्वी, २०१९ मध्ये सरासरी आंबा २.७५ किलो होता आणि त्यासाठी खरेदीदारांनी १२०० रुपयांपर्यंत पैसे देण्याचे देखील मान्य केले. नूरजहाँ आंब्यांच्या झाडाला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुलांचा बहर येतो आणि ते जूनच्या सुरूवातीस आंबे पिकून तयार असतात. काही स्थानिक उत्पादकांचा असा दावा आहे की कधीकधी नूरजहाँ हा आंबा एक फूटही उंच असतो.


‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या, नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला टोला

 

First Published on: June 7, 2021 3:50 PM
Exit mobile version