बापरे! ऑटोमॅटिक कार लॉकने घेतला एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा बळी

बापरे! ऑटोमॅटिक कार लॉकने घेतला एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा बळी

बापरे! ऑटोमॅटिक कार लॉकने घेतला एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा बळी

कार सेफ्टीसाठी आपण ऑटोमॅटिक कार लॉकचा वापर करतो. मात्र याच ऑटोमॅटिक कार लॉकने एकाच घरातील तीन चिमुकल्यांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या भरतपूर येथून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच घरातील तीन लहान मुली घराच्या बाहेर खेळत होत्या. मुली अचानक दिसेनास्या झाल्या म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. खुप शोधल्यानंतर मुली घराबाहेरील कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेमुळे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुले खेळता खेळता कुठेही निघून जातात त्यामुळे पालकांचेही कधी कधी त्यांच्याकडे लक्ष राहत नाही त्यामुळे अशा दुर्देवी प्रसगांना तोंड द्यावे लागते.

राजस्थानच्या भरतपूर येथे तीन सख्या जावा आपल्या मुलींसोबत एकत्र कुटुंबात राहत होत्या बुधवारी तिघीही सत्संग ऐकण्यासाठी गेल्या होत्या. तिघींच्याही मुली घराबाहेर खेळत होत्या. खेळता खेळता मुली घराबाहेर असलेल्या कारमध्ये लपण्यासाठी गेल्या. तेव्हा अचानक कारचा दरवाजा बंद झाला. कारला ऑटोमॅटिक लॉक असल्याने मुलींना कारबाहेर येता आले नाही. मुलींनी खुप वेळा आवाज दिला परंतु सत्संगाच्या आवाजामुळे मुलींची हाक घरच्यापर्यंत पोहचू शकली नाही. बराच काळ कारमध्ये राहिल्याने तिन्ही मुलींचा गुदमरुन कारमध्येच मृत्यू झाला. तिन्ही मुलींमध्ये हिना ही सहा वर्षांची, साडेपाच वर्षांची वैष्णवी आणि पाच वर्षांची मुलगी पीहू या तिन मुलींचा सहभाग होता.

मुली कारमध्ये अकडल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी त्वरित मुलींना कारच्या बाहेर काढले. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी मुलींना मृत घोषित केले. कारमध्ये गुदमरुन मुलींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर तब्बल ३०० वेळा केले चाकूने वार

First Published on: April 15, 2021 5:59 PM
Exit mobile version