Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर तब्बल ३०० वेळा केले चाकूने वार

पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर तब्बल ३०० वेळा केले चाकूने वार

एखादा पती ऐवढ्या निर्घुणप्रकारे आपल्या पत्नीला मारु शकतो यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही.

Related Story

- Advertisement -

पती-पत्नीमध्ये वादातून अनेक गुन्हे घडल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र एखादा पती ऐवढ्या निर्घुणप्रकारे आपल्या पत्नीला मारु शकतो यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. युनायटेड किंगडमच्या लिवरपूलमधून एक खळबळजणक प्रकार समोर आला आहे. एका पतीने आपल्याच पत्नीला इतका वेदनादायी मृत्यू दिला आहे की, त्याच्या मुलीने त्याला वडील मानण्यास नकार दिला आहे. ही धक्कादायक बातमी लिवरपूलयेथील आहे. एका पतीने त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर ३०० वेळा वार केले आहे. या हैवानाने आपल्या पत्नीवर अत्याचाराची सीमा पार करत तिची निर्घुण हत्या केली आहे. या आरोपीचे नाव जॉर्ज लेदर असून तो ६० व र्षाचा आहे. या प्रसंगानंतर जॉर्जला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आरोपी जॉर्जला पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय होता. मृत महिला ही ३ मुलांची आई होती आणि तिचं वय ५६ वर्ष होते. जॉर्जने चौकशी दरम्यान त्याचा गुन्हा मान्यही केला होता. आपल्या सैतानासारख्या वडिलांविषयी कोर्टात सांगताना जॉर्जची मुलगी म्हणाली, ”तिचा बाप सैतान आहे. मी माझ्या पित्याला पिता मानत नाही. त्याने माझ्या आईवर ३०० वेळा वार केले आहेत. जॉर्जने माझ्या आईचं जगणं मुश्किल करुन टाकले होते. तो तिला फार जास्त त्रास देत होता. आईचा जीव घेतल्यावर त्याला जराही दु:ख नव्हतं. घरात आईचा मृतदेह पडला होता. आम्ही सगळे रडत होतो आणि जॉर्ज बाथरुममध्ये आरामात शॉवर घेत होता.”असे ती म्हणाली होती. ”या हत्येची घटना फार वाईट आहे. याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. कोर्टाने जॉर्जला दोषी ठरवल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली.” असे न्यायाधिश सुनावणी दरम्यान म्हणाले.


- Advertisement -

हे वाचा- नवे पोलीस महासंचालक संजय पांडे करणार परमबीर सिंह यांची चौकशी

- Advertisement -