जाणून घ्या तिरंग्याचा इतिहास, राष्ट्रीय ध्वज म्हणून का झाली निवड?

तिरंगा हा आपला राष्ट्रीय ध्वज असून त्यावरील तीन रंग आणि अशोकचक्र यांच्यामागेही इतिहास दडला आहे. तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून २२ जुलै १९४७ साली भारतीय संविधानाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ आणि २६ जानेवारी १९५० यादरम्यान तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्विकारण्यात आले.

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी तिरंगा अभिमानाचे प्रतिक आहे. यातील प्रत्येक रंगामागे एक कारण आहे. भगवा, सफेद आणि हिरवा असे तीन रंग ध्वजात असल्यानेच त्याला तिरंगा म्हटले जाते. आंध्रप्रदेशमधील पिंगली वेंकैया यांनी तिरंगा बनवला होता.

तिरंगा फडकावण्याचे काही नियम आहेत. जसे की तिरंगा फडकावताना पाहुण्यांचे तोंड श्रोत्यांकडे असले तर तिरंगा त्यांच्या डाव्या बाजूला असायला हवा. तिरंग्यामध्ये जेव्हा चरख्याच्या जागी अशोक चक्राचे चित्र वापरले गेले त्यावेळी महात्मा गांधी नाराज झाले होते.

 

तसेच रांची येथील डोंगरावर एक मंदिर असून त्यावर तिरंगा फडकावला जातो. हे देशातील असे एकमेव मंदिर आहे ज्यावर भगव्याऐवजी तिरंगा फडकावला जातो.

राष्ट्रीय ध्वज ही देशाची शान ,आण आणि बाण असते. यामुळे भारतीय ध्वज संहितासाठी कायद्यातही तरतूद करण्यात आली आहे. ज्याला भारतीय ध्वज संहिता म्हणजे फ्लॅग कोड ऑफ इंडीया असेही म्हणतात. त्यानुसार तिरंगा नेहमी कॉटन,सिल्क अथवा खादी याच कपड्यापासून बनवलेला असला पाहीजे. तिरंगा प्लास्टीकचा असता कामा नये. तिरंगा नेहमी आयताकृतीमध्येच 3:2 या प्रमाणात असायला हवा.तिरंग्याला जमिनीचा स्पर्श होता कामा नये. सजावटीसाठी तिरंग्याचा वापर करू नये.

देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद आणि नामांकित व्यक्तींचे पार्थिव तिरंग्यात लपेटले जाते. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर किंवा दफन केल्यानंतर गोपनीय पद्धतीने सन्मानाने तिरंगा जाळला जातो. तसेच कधी तिरंग्याला वजन बांधून पवित्र नदीत जलसमाधी दिली जाते.

 

First Published on: August 12, 2021 6:17 PM
Exit mobile version