IPS अधिकारी होण्यासाठी तृप्ती भट यांनी नाकारली ISROची नोकरी

IPS अधिकारी होण्यासाठी तृप्ती भट यांनी नाकारली ISROची नोकरी

मुंबई | आजपर्यंत आपण अनेक आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या यशस्वी गोष्टी ऐकल्या आहेत. पण, इस्रोची नोकरी नकारणाऱ्या अशाच एका आयपीएस अधिकाऱ्यांचा प्रेरणादायी प्रवास उलघडणार आहोत. आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तृप्ती भट (IPS Tripti Bhat) यांनी इस्रोसह (ISRO) ६ सरकारी नोकऱ्यांची ऑफर नाकारली.

तृप्ती भट या उत्तराखंडच्या अल्मोडाच्या रहिवासी आहेत. या एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तृप्ती भट कुटुंबातील सर्वात मोठ्या आहेत. तृप्तींनी बारावीनंतर पंतनगर युनिव्हर्सिटीमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केला आहे. यानंतर तृप्तींनी इस्रोसह सहा सरकारी नोकऱ्यांची परीक्षा दिली होती. आणि त्यात त्या पास देखील झाल्या होत्या. तसेच तृप्तींनी खासगी कंपनीमध्ये देखील काम करण्याची ऑफर आली होती. या सर्व ऑफर धुडकावून तृप्ती भट यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्या प्रयत्नात तृप्ती यांनी यूपीएससीची परीक्षेत यश देखील मिळाले. तृप्ती भट या २०१३ सालच्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. तृप्ती भट १६५ रँक मिळवत आयपीएस अधिकारी झाल्या.

आयपीएस तृप्ती भट यांनी राज्य स्तरीय बॅडमिंस्तटन स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरावर १६ व १४ किमी मॅरेथॉन स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविले आहे. त्याचबरोबर तृप्ती भट या तायकांडो आणि कराटेमध्ये पारंगत आहेत. तृप्तींचा आयपीएस होण्याचा प्रवास सर्व तरुण वर्गाला प्रेरणा देणार आहे.

कोरोना काळात कौतुकास्पद कामगिरी

तृप्ती भट यांनी कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना २०२० साली प्रतिष्ठित स्कोच पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तृप्ती या एसडीआरएफ उत्तराखंडच्या कमांडर होत्या. यानंतर लॉकडाऊन आणि अनलॉक वेळी एसडीआरएफने विविध राज्यांतील सहा लाखांहून अधिक स्थलांतरितांना उत्तराखंडात सुरक्षितपणे आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

 

 

First Published on: May 8, 2023 4:20 PM
Exit mobile version