ट्रम्प यांची सुरक्षा माकडांच्या हाती

ट्रम्प यांची सुरक्षा माकडांच्या हाती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प २४ तारखेला सपत्नीक भारत दौऱ्यावर येत आहेत. यापार्श्वभूमीवर ट्रम्प ज्या ज्या स्थळांना भेट देणार आहेत तेथे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पण तरीही सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. कारण ट्रम्प आग्रा य़ेथील ताजमहाललाही भेट देणार असून तेथे माकडांनी उच्छाद मांडला आहे. या आक्रमक माकडांना आवरणे कठिण झाल्याने त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी खास पाच प्रशिक्षित माकडांना या मार्गावर तैनात करण्यात येणार आहे.

नवी दिल्लीसह, लखनौ , गुजरात व इतर ठिकाणीही ट्रम्प जाणार आहेत. ट्र्म्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेच्या सिक्रेट सर्विसकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे ही सुरक्षा व्यवस्था भेदून कबुतरही उडू शकणार नाही असे बोलले जात आहे. मात्र ताजमहालजवळील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून माकडांनी उच्छाद मांडला असून ट्रम्प यांना हे कळले तर भारतीय सुरक्षा यंत्रणेची नाचक्की होऊ शकते. यामुळे या माकडांना आवरण्यासाठी पोलीस, एटीएस, एनएसजी कमांडोची टीमच या मार्गावर तैनात करण्यात आली. पण या सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन माकड काहीवेळासाठी पसार होतात व पुन्हा येतात. प्रसंगी पादचाऱ्यांवर हल्लाही करतात. यामुळे सुरक्षा रक्षकही वैतागले आहेत. यावर उपाय म्हणून प्रशिक्षित माकड या मार्गावर तैनात करण्यात आली आहेत. जे या मोकाट माकडांना आवर घालण्याचे काम करणार आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटाच या मार्गावर नेमण्यात आला. पण साध्या माकडांचाही बंदोबस्त त्यांना करण्यात न आल्याने ट्रम्प यांची सुरक्षा माकडांच्या हाती असे म्हटले जात आहे.

First Published on: February 22, 2020 5:08 PM
Exit mobile version