मंदिर प्रवेशावेळी गोंधळ झाला तर केरळ सरकार जबाबदार – तृप्ती देसाई

मंदिर प्रवेशावेळी गोंधळ झाला तर केरळ सरकार जबाबदार – तृप्ती देसाई

तृप्ती देसाई

शबरीमाला मंदिर १६ नोव्हेंबरला दोन दिवसाच्या पुजेसाठी उघडण्यात येणार आहे. १७ नोव्हेंबरला शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी केरळ सरकार पत्र पाठवून सुरक्षेची मागणी केली होती. मात्र सुरक्षा मागूनही केरळ सरकारकडून अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे तृप्ती देसाई संपातल्या आहेत. जर शबरीमाला मंदिर प्रवेशावेळी काही गडबड झाली तर त्याला केरळ सरकार जबाबदार राहील असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

पत्राला प्रतिसाद दिला नाही

केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा ऐतिहासिक निर्णय न्यायालयानं दिला होता. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला डावलले गेले. मंदिर प्रशासन आणि आंदोलकांनी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करुन दिला नाही. हा वाद सुरु असतानाच आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई येत्या १७ नोव्हेंबरला शबरीमाला मंदिरात जाणार आहेत. केरळला जाण्यापूर्वी त्यांनी केरळच्या सरकारकडे सुरक्षा देण्याची मागणी केली. तृप्ती देसाई यांनी केरळ सरकारला पत्र पाठवले होते.

केरळ सरकारची जबाबदारी

केरळ सरकारला पत्र पाठवून देखील अद्याप उत्तर न आल्यामुळे तृप्ती देसाई संतप्त झाल्या आहेत. जर मंदिरामध्ये प्रवेश करताना काही गोंधळ झाला तर त्याची जबाबदारी केरळ सरकार आणि पोलीस महासंचालकांची असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे.

First Published on: November 15, 2018 3:42 PM
Exit mobile version