कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन डोस किती प्रभावी? केंद्राचा खुलासा

कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन डोस किती प्रभावी? केंद्राचा खुलासा

कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन डोस किती प्रभावी? केंद्राचा खुलासा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लस ही महत्त्वाचे अस्त्र आहे. त्यामुळे सर्वत्र लसीकरण मोहीम वेगाने राबवली जात आहे. जगभरात सर्वाधिक लसीकरण भारतात होत आहे. सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश भारत ठरला आहे. अमेरिकासारखा महासत्ता असलेल्या देशापेक्षा भारतात सर्वाधिक लसीकरण केले जात आहे. कोविड डॅशबोर्डनुसार, आतापर्यंत ३९ कोटी ३६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे. यादरम्यान केंद्राकडून लसीचे दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी किती प्रभावी आहे? याबाबत माहिती देण्यात आली आहे.

नीति आयोगाच्या सदस्य डॉ. वीके पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना लसीचा पहिला डोस कोरोना मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ८२ टक्के प्रभावी आहे. तर कोरोना लसीचे दोन डोस कोरोना मृत्यू रोखण्यासाठी ९५ टक्के यशस्वी आहे.’

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १६ जुलैपर्यंत देशभरात ३९.५३ कोटी पार पडले आहे. आतापर्यंत १.७७ कोटी डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तर २.७९ कोटी डोस फ्रंटलाईन वर्कर्सना दिले गेले आहेत. तसेच २२.५४ कोटी डोस ४५ वर्षांवरील नागरिकांना देण्यात आले असून १८ ते ४४ वयोगटातील १२.४३ कोटी नागरिकांना लस दिली गेली आहे.


हेही वाचा – पॉझिटिव्ह बातमी! कोरोनाच्या धोकादायक व्हेरियंटवर भारताची ‘Warm Vaccine’ प्रभावी


 

First Published on: July 16, 2021 5:20 PM
Exit mobile version