जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक

जम्मू-काश्मीरच्या शोपिंयामध्ये रविवारी सकाळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराला मोठे यश आले आहे. चकमकीत ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चकमक शोपियांच्या दारुमडोरा किगम भागामध्ये सुरु आहे. या ठिकाणी जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला घेराव घातला. या दरम्यान झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून जवानांकडून शोध मोहिम सुरु आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियांच्या दारुमडोरा किगम भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलिसांनी घेराव घालून शोध मोहीम सुरु केली. याच दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, चकमक थांबली असून जवानांकडून शोध मोहिम सुरु आहे.

First Published on: June 23, 2019 9:42 AM
Exit mobile version