शिंदे गटाच्या मागणीविरोधात आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात

शिंदे गटाच्या मागणीविरोधात आता उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांनासुद्धा शिवसेनेतील आमदार आणि नगरसेवकांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आणि त्यानंतर महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं आणि आता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने शिवसेना(shivsena) पक्षावर स्वतःचा दावा करत त्यासंदर्भात थेट निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली. या मागणीवर निवडणूक आयोगानेही कारवाई सुरू केली आणि दोन्ही गटांना शिवसेनेवरील दाव्याबाबत कागदपत्र सादर करण्यास सांगितले. खरी शिवसेना कोणाची या दाव्यासंदर्भात निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेत. निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली. जोपर्यंत शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी याचिकेतून केली आहे.

हे ही वाचा – कोणत्या राष्ट्रपतींनी पंतप्रधानांसोबत केलंय जास्त काम, 15 राष्ट्रपतींच्या 15 रंजक गोष्टी

त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने (thackeray group) सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने जी कारवाई सुरू केलीय, तिला स्थगिती देण्याची मागणी केली. या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कारवाई करू शकत नाही, असा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्याकडून याचिकेत करण्यात आला आहे.

हे ही वाचा – ”जो काँग्रेस-राष्ट्रवादी के जंजिरो मे अटके है उनके मूह से खंजीर की…

निवडणूक आयोगाचे नेमके निर्देश काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांना बहुमतासंदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आणि यासाठी ८ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली. यासंदर्भात दोन्ही गटांचे (बाजूंचे) म्हणणे ऐकून मगच निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाणसुद्धा कोणाकडे राहील यासंदर्भातही ८ ऑगस्टला निर्णय होणार आहे.

हे ही वाचा – शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदारासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाचा दावा धनुष्यबाणावरही

एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या ४० हून अधिक आमदारांनी बंड केले. शिवसेना(shivsena) पक्षात मोठं खिंडार पडलं. शिंदे गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. या सगळ्यातच राज्यातलं राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालं आणि त्या नंतर एकनाथ शिंदे(cm eknath shinde) यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटावर कारवाई करत शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालय गाठलं आणि न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाने खरी शिवसेना आमचीच असा थेट दावा केला. त्याचबरोबर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा – ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

First Published on: July 25, 2022 12:31 PM
Exit mobile version