घरताज्या घडामोडीशिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदारासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेला मोठा धक्का; माजी आमदारासह अनेकांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवकांनतर अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. परंतु यामध्ये आता खान्देश आणि नंदूरबार येथील नेत्यांनीही प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. आज हजारो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान नंदनवन येथे शिंदे गटात प्रवेश केला आहे.

नंदूरबार जिल्हयातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केट कमिटीचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. शिंदे गटाला समर्थन देणारे फॉर्म या सगळ्यांनी पाच दिवसांपूर्वी भरुन दिले आहेत.

- Advertisement -

आज जवळपास १२०० लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. आम्ही शिवसेनेतच आहोत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकर एकत्र यावं, याची आम्ही वाट पाहतोय. असं शिंदे गटात दाखल झालेले आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. दरम्यान, राज्यभरात शिवसेनेत पडझड होत असताना नाशिकचे शिवसैनिक सोबत असल्याचा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

आमदार, खासदार, नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्याशिवाय शिंदे गटाने आम्ही शिवसेनेतच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेना नक्की कुणाची? या लढाईला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ज्यांना शेंदूर फासला ते शिवसेना गिळायला निघालेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -