भारतीय ‘Covishield’ लसीला ब्रिटनकडून मान्यता, नवीन गाईडलाईन्स जारी

भारतीय ‘Covishield’ लसीला ब्रिटनकडून मान्यता, नवीन गाईडलाईन्स जारी

Covishield Vaccine: परदेशात जाणाऱ्या व शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना २८ दिवसानंतर कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस

भारताकडून देण्यात आलेल्या बऱ्याच दबावानंतर, यूके अर्थात ब्रिटनने अखेर भारतात विकसित झालेली कोरोना लस ‘कोव्हिशील्ड’ला मान्यता दिली असून ती लस स्वीकारली आहे. तसेच यासंदर्भात नवीन प्रवास नियम देखील जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, यूके सरकारने असे म्हटले, एखाद्या भारतीयाने कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरी देखील त्याला यूकेत गेल्यानंतर क्वारंटाइनच्या प्रक्रियेतून जाणं अनिवार्य असणार आहे. म्हणजेच ब्रिटनला सध्या कोव्हिशील्ड लशीची कोणतीही अडचण नाही तर कोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटबाबत शंका असल्याचे यूकेने म्हटले आहे.

यूकेच्या नव्या प्रवास गाईडलाईन्स ४ ऑक्टोबरपासून लागू होणार असून या गाईडलाईन्स काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये कोव्हिशील्ड लसीला मान्यता देण्यात आलेली नव्हती, आणि यासंदर्भात भारताकडून नाराजी देखील वर्तवण्यात आली होती. मात्र आता नव्या प्रवास गाईडलाईन्समध्ये कोव्हिशील्डचे नाव जोडले गेले आहे. नव्या ट्रॅव्हल अॅडव्हायझरीमध्ये, लसींच्या यादीत असलेल्या लसीच्या फॉर्म्युलेशनबाबत ब्रिटनने माहिती दिली असून एस्ट्राझेनका कोविशील्ड, एस्ट्राझेनका व्हॅक्सजेवरिया आणि मॉडर्ना टेकेडा या लशींना मान्यता असल्याचे म्हटले आहे.

ब्रिटनने सुरुवातीला कोविशील्डच्या लशीला मान्यता दिली नव्हती. त्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर ब्रिटनने माघार घेतली आणि भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय ऑक्सफर्ड/अॅस्ट्राजेनिका, फायझर बायोटेक, मॉडर्ना आणि जॉन्सेन लस देखील मान्यता देण्यात आली आहे. परंतु या लसी बार्बाडोस, बहारीन, ब्रुनेई, कॅनडा, डोमिनिका, इस्रायल, जपान, कुवेत, मलेशिया, न्यूझीलंड, कतार, सौदी अरेबिया येथे उपलब्ध आहेत. , सिंगापूर, दक्षिण कोरिया किंवा तैवानमधील मान्यताप्राप्त सार्वजनिक आरोग्य संस्थेशी संलग्न असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यात असे म्हटले आहे की यूकेमध्ये येण्यापूर्वी कमीतकमी १४ दिवस आधी तुमच्याकडे मान्यताप्राप्त लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.


 

First Published on: September 22, 2021 2:35 PM
Exit mobile version