बेरोजगारीचा दर २४ टक्के; पुढील काळ कामगारांसाठी कठीण – CMIE

बेरोजगारीचा दर २४ टक्के; पुढील काळ कामगारांसाठी कठीण – CMIE

लॉकडाऊन दरम्यान देशातील बेरोजगारीचा दर उच्च स्तरावर कायम आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या मते, १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर २४ टक्के झाला आहे. सीएमआयईच्या अहवालात म्हटलं आहे की अर्थव्यवस्था सुधारण्यास बराच काळ लागू शकेल आणि पुढील दिवस कामगारांसाठी कठीण असतील.

लॉकडाऊनमधील शिथिलतेचा फारसा प्रभाव नाही

सीएमआयईच्या अहवालात म्हटलं आहे की १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा दर २४ टक्के होता. जो जवळजवळ एप्रिलसारखा आहे. याचा अर्थ असा आहे की २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता करण्यात आली, मात्र बेरोजगारीवर परिणाम झालेला नाही. तथापि, श्रम भागीदारीच्या दरावर या शिथिलतेचा थोडासा परिणाम झाला. त्यामध्ये वाढ झाली आहे, ती २६ एप्रिलच्या आठवड्यात ३५.४ टक्क्यांपर्यंतच्या नीचांकी पातळीवर गेला. १७ मेच्या आठवड्यात ३८.८ टक्क्यांवर गेला. वाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर काही आर्थिक प्रक्रिया वाढतील. बेरोजगारीचा उच्च दर म्हणजे मोठ्या संख्येने कामगार काम शोधत आहेत, परंतु त्यांना काम मिळत नाही. कामगार भागीदारी दर कमी होणे म्हणजे कमी लोक काम करण्यास इच्छुक आहेत.

बेरोजगारीने विक्रम केला

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे भारतातील लोकांच्या रोजगारामध्ये प्रचंड घट झाली आहे. यापूर्वी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या मते, ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण २७.११ टक्क्यांवर पोहोचले आहे. म्हणजेच, चार जणांपैकी एक जण बेरोजगार झाला. हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक बेकारीचा दर आहे.


हेही वाचा – PM Kisan: असं जाणून घ्या सरकारने आपल्या खात्यावर २ हजार रुपये पाठवले की नाही


अर्थव्यवस्था ठप्प

कोरोनामुळे भारतासह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. भारतात, सुमारे ४० दिवसांच्या दोन-चरणांच्या लॉकडाउनमध्ये, उद्योग पूर्णपणे बंद होते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात शिथिलता असूनही, उद्योगांचे चाक व्यवस्थित चालू शकलं नाही. हजारो स्थलांतरित मजूर अजूनही मोठ्या शहरांमधून घरी परतत आहेत.

 

First Published on: May 19, 2020 10:36 PM
Exit mobile version