बापरे! भारतात पहिल्याच दिवशी ६७ हजार मुलं आली जन्माला!

बापरे! भारतात पहिल्याच दिवशी ६७ हजार मुलं आली जन्माला!

प्रातिनिधीक फोटो

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरात सुमारे चार लाख मुलं जन्माला आली तर सर्वात जास्त ६७ हजार ३८४ मुलं भारतात जन्माला आली. युनिसेफच्या मते, जगभरात नवीन वर्षात सुमारे ३ लाख ९२ हजार ०७८ मुलं जन्माला आली. यामध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे तर पाठोपाठ चीन दुसऱ्या स्थानावर आहे. चीनमध्ये नवीन वर्षात ४६ हजार २९९ मुलं जन्माला आली आहेत.

संयुक्त राष्ट्र बाल निधीचे नवे कार्यकारी संचालक हेनरिटा एच.फोर म्हणाले की, नवीन वर्षाची आणि दशकाची सुरुवात केवळ आपल्या भविष्यासाठी नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठी आशा आणि आकांक्षा व्यक्त करण्याची संधी आहे. दरवर्षी जानेवारीत आम्हाला प्रत्येक मुलाच्या आयुष्याचा प्रवासाच्या सर्व गोष्टींची आठवण येते.

पुढे ते असं म्हणाले, युनिसेफ हे दरवर्षी जानेवारीत नवीन वर्षात जन्मलेल्या मुलांचा जन्म जगभर साजरा करते. २०२७ पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकेल असा अंदाज आहे.

२०२० मध्ये कदाचित पहिल्या मुलाचा फिजी देशामध्ये जन्म झाला होता तर शेवटचा जन्म अमेरिकेत झाला. या यादीमध्ये भारत (६७ हजार ३८५), चीन (४६ हजार २९९), नायजेरिया (४६ हजार २९९), पाकिस्तान (१६ हजार ७८७), इंडोनेशिया (१३ हजार ०२०), अमेरिका (१० हजार ४५२), रिपब्लिक ऑफ कांगो (१० हजार २४७) आणि इथिओपिया (८ हजार ४९३) यांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार २०१९ ते २०५० दरम्यान भारताची लोकसंख्या तब्बल २७.३ करोड इतकी वाढण्याचा अंदाज आहे. याच काळात नायजेरियातील लोकसंख्या २० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर २०५० मध्ये जागतिक लोकसंख्येच्या वाढीत या दोन देशांची एकूण लोकसंख्या २३ टक्के होईल. तर चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १.४३ अब्ज तर भारताची १.३७ अब्ज होण्याचा अंदाज आहे.


हेही वाचा – दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले


 

First Published on: January 2, 2020 4:39 PM
Exit mobile version