दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

आज सकाळच्या सुमारास दिल्लीतील पिरागढ भागातील एका कारखान्याला सकाळी ४.३० वाजता आग लागल्याची घटना घडली आहे.

burning factory building collapsed in delhi; several people trapped 1
दिल्लीत आग विझवताना इमारत कोसळली; अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

आज सकाळच्या सुमारास दिल्लीतील पिरागढ भागातील एका कारखान्याला सकाळी ४.३० वाजता आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सात बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट झाला. परिणामी कारखान्याची इमारत कोसळली. या अपघातात अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले

या घटनेची माहिती देताना अग्निशामक दलाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की, ‘आग विझवण्याचे काम सुरू असताना इमारतीत स्फोट झाला. त्यामुळे इमारत कोसळली. यामध्ये जवानांसह अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. संपूर्ण घटनेवर आपण नजर ठेवून असल्याचं देखील केजरीवाल यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा – नवीन वर्षात बँका तब्बल २५ दिवस बंद राहणार!