Union Budget 2021: यामुळे २८ ऐवजी १ फेब्रुवारीला सादर केला जातो अर्थसंकल्प

Union Budget 2021: यामुळे २८ ऐवजी १ फेब्रुवारीला सादर केला जातो अर्थसंकल्प

यामुळे २८ ऐवजी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर करणार आहेत. मात्र, आज १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प याआधी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता. देशाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाचा अर्थसंकल्प सादर केला जायचा. मात्र, ही परंपरा एनडीए सरकारने २०१६ साली मोडीत काढली आणि रेल्वेचा अर्थसंकल्प हा सर्वसाधारण अर्थसंकल्पातच सादर करण्यात आला. फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर न करता १ फेब्रुवारीला सादर करण्यामागे मोदींच्या नेतृत्त्वातील एनडीए सरकारचा हेतू आहे.

भारत सरकारच्या सर्वात मोठ्या मंत्रालयांपैकी एक असलेल्या रेल्वे मंत्रालयाचा अर्थसंकल्प दरवर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी सादर केला जात होता. देशाचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प १९२४ मध्ये सादर करण्यात आला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारने २०१६ मध्ये ही परंपरा बदलली. शिवाय, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पात एकत्र करुन सादर केला. २०१६ मध्ये देशातील फक्त रेल्वेच्या अर्थसंकल्पाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला नाही. त्याऐवजी ब्रिटीश काळापासून अस्तित्वात असलेली एक जुनी परंपराही मोडण्यात आली. मोदी सरकारने फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जाणारा सर्वसाधारण अर्थसंकल्प पहिल्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीपासून सादर करण्यास सुरवात केली. यामागील कारण म्हणजे नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात. जेणेकरुन सरकार १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षावर काम करण्यास सुरवात करेल आणि अर्थसंकल्प अधिक चांगल्या पद्धतीने लागू होऊ शकेल. अन्यथा, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मे-जून पर्यंत वेळ लागत असे.

बजेटशी निगडित ब्रिटीश काळातील आणखी एक परंपरा भाजप सरकारच्या काळात मोडीत काढण्यात आली. तत्पूर्वी, देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प संध्याकाळी पाच वाजता सादर करण्यात आला होता, परंतु माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी १९९९ मध्ये भाजपाप्रणित एनडीए सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प संध्याकाळी सादर न करता सकाळी ११ वाजता संसदेमध्ये सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी ११ झाली.


हेही वाचा – अर्थसंकल्पाचे लेटेस्ट अपडेट्स येथे जाणून घ्या


 

First Published on: February 1, 2021 11:20 AM
Exit mobile version