Union Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा

Union Budget 2023 : अर्थसंकल्पात शिक्षण, रोजगार, कौशल्य विकासासाठी मोठ्या घोषणा

देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासावर अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. (union budget 2023 check important provision announced by finance minister in education employment and skill development sectors)

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी पुढील तीन वर्षांत 38,000 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची भरती केली जाणार आहे. या शाळांमधून 3.5 लाख आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते.

याशिवाय, अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्याची घोषणा केली.

अर्थसंकल्पातील घोषणा


हेही वाचा – budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी गतवर्षीपेक्षा अधिक तरतूद

First Published on: February 1, 2023 4:03 PM
Exit mobile version