घरअर्थजगतbudget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी गतवर्षीपेक्षा अधिक तरतूद

budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी गतवर्षीपेक्षा अधिक तरतूद

Subscribe

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने क्रीडा मंत्रालयासाठी 3397.32 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने क्रीडा मंत्रालयासाठी 3397.32 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा गतवर्षीच्या अर्थसंकल्पापेक्षा 334.72 कोटी रुपये अधिक आहे. (Union Budget 2023 Budget For Sports Expectations This Year Know In Marathi)

गेल्या काही वर्षांत भारतीय खेळाडू जगभरात चांगली कामगिरी केली आहे. ऑलिम्पिक असो वा राष्ट्रकुल स्पर्धा, भारताची पदकतालिका वाढली आहे. केंद्र सरकारकडून क्रीडा आणि खेळाडूंवर करण्यात येत असलेल्या खर्चाचा यात मोठा वाटा आहे.

- Advertisement -

2020-21 मध्ये क्रीडा बजेट 2826.92 कोटी रुपये होते. 2021-22 मध्ये त्यात 230.78 कोटी रुपयांची कपात करण्यात आली होती, म्हणजेच 2021-22 मधील क्रीडा बजेट 2596.14 कोटी रुपये होते, जे 2757.02 कोटी रुपये करण्यात आले. 2021 च्या ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहता ती 305.58 कोटी रुपये करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एकूण क्रीडा बजेट 3062.60 होते.

2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. कोरोनामुळे सर्व अडचणी आणि निर्बंध असतानाही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यानंतर 2022 मध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट होती. भारताने एकूण 61 पदके जिंकली. देशात क्रीडा उपक्रम आता टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू झाले आहेत आणि 2022 हा हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्वरूपात जागतिक स्पर्धांसह अतिशय महत्त्वाचा हंगाम आहे. अशा परिस्थितीत सरकारने क्रीडा बजेटमध्ये वाढ केल्यास क्रीडा सुविधा सुधारण्यास मदत होऊ शकते. यंदा भारताला आशियाई खेळांव्यतिरिक्त अनेक जागतिक अजिंक्यपदांमध्ये भाग घ्यायचा आहे.

- Advertisement -

खेलो इंडियाच्या बजेटमध्ये वाढ

खेलो इंडियासाठी 2020-21 च्या बजेटमध्ये 890.42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यानंतर 2021-22 च्या क्रीडा बजेटमध्ये खेलो इंडियासाठी 232.71 कोटी रुपयांची कपात करण्यात आली. वर्ष 2021-22 मध्ये 657.71 कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. त्याचवेळी 2022-23 मध्ये खेलो इंडिया कार्यक्रमात 316 कोटी 29 लाख रुपये वाढवून ते 974 कोटी रुपये करण्यात आले. 2023-24 साठी हे बजेट 1000 कोटी रुपये करण्यात आले आहे.

राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या बजेटमध्ये काय?

राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या 2020-21च्या बजेटमध्ये 245 कोटी रुपयांची रक्कम होती, जी 2021-22 मध्ये सुधारित करण्यात आली आणि त्या रकमेत 32 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. 2021-22 आर्थिक वर्षासाठी बजेट 280 कोटी रुपये करण्यात आले. 2022-23 च्या क्रीडा अर्थसंकल्पात तो तसाच ठेवण्यात आला होता.

गतवर्षी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) वाटपात कपात करण्यात आली होती. एसएआयच्या बजेटमध्ये 7 कोटी 41 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे, जी 653 कोटी रुपये होती. 2021-22 मध्ये 660.41 कोटी रुपये वाटप करण्यात आले, तर बीई 2020-21 मध्ये वाटप 500 कोटी रुपये होते.

क्रीडा प्रोत्साहन रक्कम वाढविण्यात आली

गेल्यावर्षी खेळाडूंच्या एकूण प्रोत्साहन आणि बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली होती. जी 245 कोटी रुपयांवरून 357 कोटी रुपयांपर्यंत वाढली होती. खेळाडूंच्या प्रमोशनसाठी बजेट 53 कोटींवरून 55 कोटींपर्यंत वाढवण्यात आले होते. 2020-21 मध्ये ही रक्कम 70 कोटी रुपये होती, जी 2021-22 मध्ये 53 कोटी रुपये झाली. त्याचबरोबर साई स्टेडियमच्या दुरुस्तीचे बजेट 30 कोटींवरून 16 कोटी रुपये करण्यात आले.

यंदा भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. यामध्ये 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान ग्वांगझू येथे होणार्‍या आशियाई खेळांचा समावेश आहे. याशिवाय मध्य प्रदेशात खेलो इंडिया युथ गेम्स सुरू आहेत. अशा स्थितीत क्रीडा बजेट गेल्या वेळेच्या तुलनेत वाढवता येऊ शकते.


हेही वाचा – Union Budget 2023 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्य, गरीब हद्दपार; विजय वडेट्टीवारांची टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -