रामनवमी हिंसाचार : केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली राज्यपालांशी चर्चा, भाजपाची कलकत्ता हायकोर्टात धाव

रामनवमी हिंसाचार : केंद्रीय गृहमंत्र्यांनी केली राज्यपालांशी चर्चा, भाजपाची कलकत्ता हायकोर्टात धाव

भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 नुसार असं करणं ही फसवणूक मानली जाते आता या प्रकरणामंमध्ये 10 वर्षांपर्यंतची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा अहवाल तयार केला आहे.

रामनवमीच्या मुहूर्तावर पश्चिम बंगालमधील हावडा येथे झालेल्या हिंसाचाराची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांत मझुमदार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती घेतली. दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने हिंसाचार प्रकरणी कलकत्ता हायकोर्टात धाव घेतली आहे. या हिंसाचाराची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपने हाय कोर्टात केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप अध्यक्ष सुकांत मझुमदार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यपालांशी चर्चा केली. त्यानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याबाबत गृहमंत्र्यांनी माहिती घेतली.

कलकत्ता हायकोर्टात दाखल केली याचिका

हावडा आणि दालखोला येथील हिंसाचाराच्या घटनांबाबत पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी कलकत्ता हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच एनआयए चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या भागांत केंद्रीय दल तैनात करावे, अशीही मागणी त्यांनी केली. कार्यावाहक न्यायमूर्तींनी जनहित याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आणि ती 3 एप्रिल रोजी यादीच्या शीर्षस्थानी प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले.

रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार

पश्चिम बंगालमध्ये काल(गुरुवार) रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचाराची घटना घडली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडा येथे आज पुन्हा एकदा दगडफेक झाली आहे. येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

पश्चिम बंगालच्या हावडा शहरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाला होता. हा वादात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यामध्ये समाजकंठकांनी अनेक वाहने पेटवून दिली होती. त्यामुळे तणावांच वातावरण निर्माण झालं होतं. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत


हेही वाचा : रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार


 

First Published on: March 31, 2023 7:50 PM
Exit mobile version