Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार

रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये काल(गुरुवार) रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचाराची घटना घडली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील हावडा येथे आज पुन्हा एकदा दगडफेक झाली आहे. येथील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

पश्चिम बंगालच्या हावडा शहरात रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन गटात वाद निर्माण झाला होता. हा वादात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यामध्ये समाजकंठकांनी अनेक वाहने पेटवून दिली होती. त्यामुळे तणावांच वातावरण निर्माण झालं होतं. या हिंसाचारात अनेक लोक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रामनवमी सण शांततेत साजरा करण्याचं आणि मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

- Advertisement -

रामनवमीची मिरवणूक शांततेत काढा. सध्या रमजान सुरू असल्याने मुस्लिम भागातून मिरवणूक काढणं टाळा. रामनवमी शांततेने साजरी करा, हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न करू नका. चिथावणी देऊ नका, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं.


हेही वाचा : गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ठोठावला दंड, वाचा काय आहे प्रकरण


 

- Advertisment -