Video: ‘भाभीजी पापड खा आणि कोरोनावर मात करा’, भाजपच्या खासदाराचा अजब दावा!

Video: ‘भाभीजी पापड खा आणि कोरोनावर मात करा’, भाजपच्या खासदाराचा अजब दावा!

Video: 'भाभीजी पापड खा आणि कोरोनावर मात करा', भाजपच्या खासदाराचा अजब दावा!

भाजपचे काही नेते कोरोना संदर्भात अनेक अजब वक्तव्य करून चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी अजब वक्तव्य करून चर्चे आले होते. त्यांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गोमूत्र प्या असा सल्ला दिला होता. आता संसदीय कार्यमंत्री आणि बिकानेरेचे भाजप खासदार अर्जुन राम मेघवाल यांनी अजब दावा केला आहे. पापड खाल्ल्याने कोरोना व्हायरस ठीक होईल, असा दावा त्यांनी केला आहे. यामुळे मेघवाल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

संसदीय कार्यमंत्री आणि बिकानेरेचे भाजप खासदार अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते एका खासगी कंपनीचा पापड लाँच करण्यात आला. यादरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पापड लाँच कार्यक्रमात मेघवाल म्हणाले की, ‘कोरोनाचा सामना करण्यासाठी या पापडाने आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील’, असा अजब दावा केला आहे.

खासदार अर्जुन राम मेघवाल व्हिडिओत पुढे म्हणाले आहेत की, ‘हे आत्मनिर्भर भारतअंतर्गत ‘भाभीजी पापड’ नावाने एका खासगी उद्योजकाने पापड तयार केले आहेत. या पापडामुळे कोरोना व्हायरस सामना करण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज तयार होतील. कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतील. माझ्या त्यांनी शुभेच्छा आणि ते यशस्वी होती अशी मला आशा आहे.’ सध्या या व्हिडिओमुळे मेघवाल चांगलेच चर्चेत आले आहेत.


हेही वाचा – देशात कोरोनाचा उद्रेक; २४ तासांत ४९,३१० नवे रुग्ण


 

First Published on: July 24, 2020 8:01 PM
Exit mobile version