बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे चीनवर प्रश्न विचारत आहेत – रविशंकर प्रसाद

बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे चीनवर प्रश्न विचारत आहेत – रविशंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. रविशंकर प्रसाद यांनी कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या लेखावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “मला काहीच हरकत नाही, जर त्या मनरेगाची तुलना यूपीएशी करत असतील तर त्यांनी एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव घ्यायला हवं होतं,” असं रविशंकर प्रसाद म्हणाले. हिमाचल जन संवाद व्हर्च्युअल रॅलीमध्ये संबोधित करताना रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

रविशंकर प्रसाद म्हणाले की कोरोना संकटाच्या वेळी भाजप-कॉंग्रेस कोण करत आहे? तर राहुल गांधी करीत आहेत. लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लॉकडाऊनला पाठिंबा देणारे त्यांचे मुख्यमंत्री त्यांचं म्हणणं ऐकूण घेत नाही आहेत का? यूपीए आणि मोदी सरकारमध्ये काय फरक आहे, हे मी आज तुम्हाला सांगतो, असं देखील ते म्हणाले. मोदी सरकारची कामगिरी सांगताना रविशंकर प्रसाद म्हणाले की तुमचं (यूपीए) सरकार योग्यप्रकारे काम करत नव्हतं, तर आमचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. यापूर्वी मनरेगाचे पैसे कामगारांना मिळत नव्हते, तर आज ते त्यांच्या खात्यात जमा होतात. यूपीए सरकारमध्ये २१.४ टक्के काम झालं होतं, तर आज .६७.२९ टक्के काम केलं जात आहे.


हेही वाचा – होय, चीनने भारताच्या जमीनीवर कब्जा केलाय पण…; भाजपचं राहुल गांधींना उत्तर


राहुल गांधी अर्थव्यवस्था आणि सामरिक रणनीती किती समजतात, यावर चर्चा झाली पाहिजे. राहुल गांधींना एवढी समज असायला हवी की चीनशी संबंधित प्रकरणावर ट्विटरवरुन प्रश्न विचारायचे नसतात. रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी थोड्या गोष्टी समजून घ्या. हे तेच राहुल गांधी आहेत जे बालाकोटबाबत पुरावा मागत होते. उरी हल्ल्यावरही प्रश्न उपस्थित केले होते. आता चीनवर प्रश्न विचारत आहे. चीनचा गोष्टी आली तर मग कॉंग्रेसने हे प्रकरण कसं हाताळलं तेही समोर येईल.

 

First Published on: June 10, 2020 3:35 PM
Exit mobile version