‘या’करता चक्क मुलांने केले बाहुलीशी लग्न

‘या’करता चक्क मुलांने केले बाहुलीशी लग्न

मुलांने केले चक्क बाहुलीशी लग्न

लग्न म्हटलं की वधू – वर हे आलेच. त्याप्रमाणे नवराचे – नवरीशी लग्न होते. मात्र, एका तरुणांने चक्क बाहुलीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमधील एका तरुणांने एका लाकड्या बाहुलीशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. या अनोख्या आणि विचित्र लग्नसोहळ्याची उत्तर प्रदेश आणि इतर देशात देखील चांगलीच चर्चा सुरु असून या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

का केले असे लग्न?

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील मनकवार गावात एका तरुणाच चक्क लाकड्या बाहुलीसोबत लग्न पार पडले. या तरुणांने आपल्या आई – वडिलांच्या शेवटच्या इच्छेसाठी हे पाऊल उचले. वयाच्या ९० व्या वर्षी शिवमोहन यांना ९ मुले आहेत. त्यांची सर्वांची लग्न झाली होती. फक्त सर्वात लहान पंचराज या मुलाचे अद्याप लग्न झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्याचे लग्न जमवण्यासाठी कुटुंबीय प्रयत्न करत होते. मात्र, काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. दरम्यान, पंचराज याचे लग्न पाहण्याची शिवमोहन यांची अखेरची इच्छा आहे, असे ते म्हणाले. आपल्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला मोठ्या व्यक्तींनी एक पर्याय शोधला.

त्यानुसार पंचराज याला लाकडीच्या बाहुलीशी लग्न करायचे सुचवले. सर्वप्रथम पंचराज लग्न करण्यासाठी तयार नव्हता. मात्र, वडिलांच्या अखेरच्या इच्छेसाठी तोही लग्नासाठी तयार झाला. त्याप्रमाणे लाकडी बाहुलीसोबतच्या लग्नासाठी रितसर मुहुर्त काढण्यात आला. गावकरी, पाहुणे आदिंना आमंत्रणं पाठवण्यात आले आणि १८ जून रोजी सोशल डिस्टन्सिंग पाळत हा अनोखा विवाह सोहळा अखेर पार पडला.


हेही वाचा – MP: PPE किट परिधान करून पॉझिटिव्ह आमदार राज्यसभा निवडणुकीचं मतदान करण्यासाठी हजर!


 

First Published on: June 19, 2020 6:06 PM
Exit mobile version