कोरोनाग्रस्त असलेल्या संशयावरून चालत्या बसमधूम मुलीला फेकले आणि…

कोरोनाग्रस्त असलेल्या संशयावरून चालत्या बसमधूम मुलीला फेकले आणि…

कोरोनाग्रस्त असलेल्या संशयावरून धावत्या बसमधूम मुलीला फेकले आणि...

देशभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सुरू असताना उत्तर प्रदेशातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्ग झाल्याच्या संशयावरून कंडक्टरने उत्तर प्रदेशात एका बसमधून प्रवास करणार्‍या दिल्लीतील १९ वर्षीय मुलीला चालत्या गाडीतून बाहेर ढकलून दिले. यामुळे मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दिल्ली महिला आयोगाने याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांना नोटीस बजावली आहे. महिला आयोगाने पोलिसांना १५ जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मथुराच्या एसएसपीला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, दिल्ली महिला आयोगाला दिल्लीतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तामुळे दिल्लीतील मंडवली येथे राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे. ही मुलगी युपीच्या मथुरा भागात बसने प्रवास करत होती, यावेळी ही मुलीला अचानक चालत्या बसमधून फेकण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झाला असावा, अशा संशयावरून बसच्या चालक आणि कंडक्टरने या मुलीला बसमधून बाहेर फेकले मुलगी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मथुरा येथील टोल प्लाझाजवळ चालत्या बसमधून मुलीला फेकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना सांगितले की, ही अत्यंत गंभीर बाब असून पोलिसांनी त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. महिला आयोगाने पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागितली आहे. आयोगाने असे म्हटले की, जर आरोपींना अटक केली गेली नसेल तर याची कारणे द्यावीत. कृपया या प्रकरणात केलेल्या विस्तृत कारवाईचा अहवालही सादर करावा. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना १५ जुलैपर्यंत ही माहिती देण्यास सांगितले आहे.


भारताकडून आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे बरं वाटतंय – ब्राझीलचे राष्ट्रपती
First Published on: July 9, 2020 1:09 PM
Exit mobile version